agriculture news in marathi, unseasonal rain heats some parts in Vidharbha | Agrowon

विदर्भाला पावसाचा फटका
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 मार्च 2018

नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. १४) पावसाने हजेरी लावली. हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या या सरींनी पिकांचे जास्त नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला, तरी पिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविली जात आहे.

नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. १४) पावसाने हजेरी लावली. हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या या सरींनी पिकांचे जास्त नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला, तरी पिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविली जात आहे.

अमरावती विभागातील अकोला, अमरावती, नागपूर विभागात नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी (ता. १५) रात्री तसेच शुक्रवारी (ता. १६) सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. काही शेतकऱ्यांचा गहू उभा आहे. तर संत्र्याच्या आंबिया बहरालादेखील या वातावरणाचा फटका बसू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. आंब्याच्या झाडाला बारीक फळधारणा झाली आहे. लिंबूच्या आकाराच्या असलेल्या या फळांचीदेखील गळ झाल्याचे प्रकार काही ठिकाणी घडले. दरम्यान अमरावती विभागात नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी प्राथमिक अहवाल मागविण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली. नागपूर विभागात नुकसानकारक पाऊस झाला नसल्याचेदेखील कृषी विभागाने सांगितले.

"पावसाचा उशिरा पेरणी झालेल्या गव्हाला फटका बसण्याची शक्‍यता आहे. फळझाडांचादेखील बहर किंवा फळ गळण्याची शक्‍यता या वातावरणामुळे आहे. सूर्यप्रकाशाअभावी झाडांची अन्नद्रव्य शोषण्याची प्रक्रिया मंदावते, वेलवर्गीय भाजीपाल्यावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. आंबा मोहर किंवा छोट्या आकाराच्या फळांचीदेखील गळ संभवते'
- मोहन खाकरे, कृषी विद्यावेत्ता
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...