agriculture news in marathi, The upcoming Lok Sabha election should be done on agricultural policies: Decrease | Agrowon

आगामी लोकसभा निवडणूक कृषी धोरणांवर झाली पाहिजे ः घनवट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

परभणी ः सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी शरद जोशीप्रणीत भारत उत्थान कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. २०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक कृषी धोरणाच्या मुद्द्यांवर झाली पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी बुधवारी (ता. २६) केले.

परभणी ः सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी शरद जोशीप्रणीत भारत उत्थान कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. २०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक कृषी धोरणाच्या मुद्द्यांवर झाली पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी बुधवारी (ता. २६) केले.

शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या शिर्डी येथे १० ते १२ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अधिवेशनाच्या तयारीसाठी बोबडे टाकळी (ता. परभणी) येथे बुधवारी (ता. २६) आयोजित जाहीर सभेत श्री. घनवट बोलत होते. या वेळी युवा आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष सतीश दाणी, पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख अनिल चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या विभागप्रमुख सीमा नरवाडे, जिल्हाध्यक्ष गजनान देशमुख आदी उपस्थित होते.

श्री. घनवट पुढे म्हणाले, सध्याच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी वर्ग अडचणी सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शरद जोशीप्रणीत भारत उत्थान कार्यक्रम (मार्शल प्लॅन) अमलात आला पाहिजे. आगामी २०१९ मधील लोकसभा निवडणूक कृषी धोरणावर झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे. गेल्या वीस वर्षांत लाखो शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्कारावा लागला. शेतकरी सरकाराचे देणे लागत नसून, सरकारच शेतकऱ्यांचे देणे लागते. शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळाले पाहिजेत. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, थंडी, कीड, रोग, वन्यप्राण्यांकडून केली जाणारी पिकांची नासाडी याबद्दल शेतकऱ्यांचा काहीही दोष नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी, सातबारा कोरा करण्यासाठी, न्याय हक्क तसेच हितासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन सरकारवर दबाव वाढवावा लागणार आहे. त्यासाठी शिर्डी येथे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या शेतकरी संघटनेच्या अधिवेशनास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. घनवट

इतर ताज्या घडामोडी
दीड टक्‍क्‍यावर मराठवाड्यातील पाणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प व...
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या...
कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू...सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना...
पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा...माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या...
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधारनागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’...
नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या...नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत....
पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यापुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी...मुंबई  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायतीत बैठक...मुंबई : शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा...
आकड्यांचा खेळ आणि पोकळ घोषणा : शेतकरी...पुणे ः राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची निराशा झाली...
राज्यावर पावणेपाच लाख कोटींचे कर्जमुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा सभात्यागमुंबई : अर्थसंकल्प विधिमंडळात सादर...
संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या...नाशिक  : आषाढी एकादशी वारीसाठी संत श्री...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...