agriculture news in Marathi, Upgradation of the key market has improved | Agrowon

कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 एप्रिल 2019

नागपूर ः सोयाबीनचे दर स्थिर असताना काही अंशी तुरीच्या दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली. या आठवड्यात तुरीचे दर ४६०० ते ५४०० रुपये क्‍विंटलवर पोचले होते. गेल्या आठवड्यात हेच दर ५३४२ रुपयांवर होते, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. 

कळमणा बाजार समितीत तुुरीची रोजची आवक सरासरी १००० क्‍विंटलची आहे. गेल्या आठवड्यात तुरीचे दर ४४०० ते ५३४२ रुपये क्‍विंटल होते. या आठवड्यात हे दर ४६०० ते ५४०० रुपयांवर पोचले. दरात आणखी काही अंशी सुधारणांची शक्‍यता व्यापारी वर्तवित आहेत. परंतु, दर किती वाढतील याबाबबत मात्र अनिश्‍चितता असल्याचे सांगितले जाते.  

नागपूर ः सोयाबीनचे दर स्थिर असताना काही अंशी तुरीच्या दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली. या आठवड्यात तुरीचे दर ४६०० ते ५४०० रुपये क्‍विंटलवर पोचले होते. गेल्या आठवड्यात हेच दर ५३४२ रुपयांवर होते, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. 

कळमणा बाजार समितीत तुुरीची रोजची आवक सरासरी १००० क्‍विंटलची आहे. गेल्या आठवड्यात तुरीचे दर ४४०० ते ५३४२ रुपये क्‍विंटल होते. या आठवड्यात हे दर ४६०० ते ५४०० रुपयांवर पोचले. दरात आणखी काही अंशी सुधारणांची शक्‍यता व्यापारी वर्तवित आहेत. परंतु, दर किती वाढतील याबाबबत मात्र अनिश्‍चितता असल्याचे सांगितले जाते.  

बाजारात सोयाबीनची देखील नियमित आवक आहे. गेल्या आठवड्यात ५०० क्‍विंटलची सरासरी आवक होती. या आठवड्यात ही आवक ३५० क्‍विंटलपर्यंत खाली आली. सोयाबीनचे दर ३४०० ते ३६७६ रुपये क्‍विंटल होते. या आठवड्यात हे दर ३४०० ते ३६२७ रुपयांवर पोचले. बाजारात तांदळाची ५० क्‍विंटलची आवक आहे. ४५०० ते ५००० रुपये क्‍विंटलने तांदळाचे व्यवहार झाले. लुचई तांदळाची आवक १०० क्‍विंटलची असून २२०० ते २४०० रुपये असे दर आहेत. 

ज्वारीची ४ क्‍विंटलची आवक झाली. २३०० ते २६०० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. सरबती गहू २२०० ते २५०० रुपये क्‍विंटल असून आवक १००० क्‍विंटलच्या आसपास होती. इतर गहू वाणाची आवकदेखील ९०० क्‍विंटलची असून १७०० ते १८७२ रुपयांचे दर होते. आंब्याची देखील बाजारात नियमीत आवक सुरू आहे. गेल्या आठवड्यात आंबा आवक २००० क्‍विंटल तर दर २५०० ते ३८०० रुपये होते. या आठवड्यात आवक ३००० क्‍विंटल तर दर २००० ते ३६०० रुपयांवर पोचले. 

बटाटा दर ८०० ते १००० रुपयांवर स्थिर आहेत. बटाट्याची आवक २७०० क्‍विंटलच्या घरात आहे. बाजारात टोमॅटोची आवक ११० क्‍विंटल तर दर १२०० ते १५०० रुपये आहेत. चवळी शेंगाची आवक ११० क्‍विंटलची तर दर ३४०० ते ३८०० रुपये असे आहेत. बाजारात भेंडीचे व्यवहार २५०० ते ३००० रुपये क्‍विंटलने झाले. १२० क्‍विंटलची आवक नोंदविण्यात आली. गवार शेंगांची आवक १४० क्‍विंटल तर दर २४०० ते २८०० रुपये असे आहेत.  ढोबळी मिरची २५०० ते ३०००  रुपये क्‍विंटल आणि आवक ११० क्‍विंटलची आहे. कारली ३२०० ते ३६०० रुपये क्‍विंटल आणि आवक १४३ क्‍विंटलची होती.
 

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर...पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ३०००...साताऱ्यात १५०० ते २००० रुपये सातारा येथील...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३...
सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणासोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत श्रावण घेवडा,...पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाच्या...जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते,...
परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबू प्रतिक्विंटल ८०० ते ६०००...जळगावात २४०० ते ४००० रुपये  जळगाव : कृषी...
कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५०...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी...जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मानवत बाजार समितीत उद्यापासून हळद खरेदीमानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार...
अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मागणीपुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय...
औरंगाबादेत आंबा ४ हजार ते १० हजार रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...