agriculture news in marathi, Upload one lack 25000 farmers list | Agrowon

अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची यादी अपलोड
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता महिनाअखेरीस खात्यात जमा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानुसार तीन लाख २ हजार ९३० शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. यातील पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. 

अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता महिनाअखेरीस खात्यात जमा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानुसार तीन लाख २ हजार ९३० शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. यातील पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. 

केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वार्षीक सहा हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली. प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यांत ही मदत दिली जाणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी यातील पहिल्या टप्प्याचे वितरण होईल. त्या पार्श्‍वभूमीवर संबंधित यंत्रणांना या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यंत्रणा देखील कंबर कसून कामाला लागल्याचे चित्र आहे. त्यासाठी ५ ते २६ फेब्रुवारी दरम्यानचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानुसार गावनिहाय खातेदारांची संगणकीकृत यादी राष्ट्रीय अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गंत विकसित ई-फेरफार प्रणालीतून तयार करण्यात आली. यामध्ये वनहक्‍क कायद्याअंतर्गंत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबांचा समावेश करण्यात आला. 

जिल्हा स्तरावर दोन हेक्‍टरच्या आतील पाच एकरापर्यंत शेती असणारे तीन लाख २ हजार ९३० शेतकरी आहेत. यापैकी योजनेच्या निकषानुसार अपात्र खातेदार वगळून सद्यःस्थितीत सव्वा लाख शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली. लवकरच योजनेसाठी   पात्र सर्वच लाभार्थ्यांची यादी अपलोड केली जाईल, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. संपूर्ण यादी अपलोड झाल्यानंतरच लाभार्थ्यांचा आकडा निश्‍चित होणार आहे. जिल्ह्यातील पाच एकरातील शेतकऱ्यांना १८१.७५ कोटी मिळण्याची शक्‍यता आहे. 

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...