agriculture news in Marathi, urad arrival down in jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगावात उडदाची आवक घटली
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात उडदाची आवकही घटली. त्याचे दर ३५०० पासून ५००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. खानदेशातील डाळ उद्योगाला उडदाची गरज भासू लागली असून, डाळमिलचालक थेट बाजार समितीमध्ये येऊन लिलावातून उडीद खरेदी करू लागले आहेत. परिणामी दर व मागणी यात काहीशी वाढ दिसत आहे. 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात उडदाची आवकही घटली. त्याचे दर ३५०० पासून ५००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. खानदेशातील डाळ उद्योगाला उडदाची गरज भासू लागली असून, डाळमिलचालक थेट बाजार समितीमध्ये येऊन लिलावातून उडीद खरेदी करू लागले आहेत. परिणामी दर व मागणी यात काहीशी वाढ दिसत आहे. 

पुढील काळात उडदाचे दर हमीभावापुढे पोचतील, असे संकेत आहेत. एकट्या जळगाव शहरात १०० पेक्षा अधिक डाळमिल असून, त्यांना रोज ५०० ते ६०० क्विंटल उडदाची गरज असते. बाजार समितीमधील अडतदारांकडे डाळमिलचालक उडदासंबंधी नोंदणी करतात. नामांकित पापड उद्योगांना जळगाव शहरातील डाळमिलमधून उडीद डाळीचा पुरवठा केला जातो. मध्यंतरी दर्जा कमी असल्याचे कारण सांगून दर कमी दिले जात होते. पण आता उडीद हवा तेवढा मिळत नसल्याने दरही वाढू लागले आहेत. मागील आठवड्यात उडदाची आवक प्रति दिन ५०० क्विंटलवर आली.

या महिन्याच्या सुरवातीला उडदाची आवक प्रतिदिन ८०० क्विंटलपर्यंत होती. गत आठवड्यात प्रथमच कमाल दर ५००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचला. यासोबत मुगाची आवकही प्रचंड घटली असून, ती गत आठवड्यात प्रति दिन ३०० क्विंटलपर्यंत होती. दर ४००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल, असे होते.

सोयाबीनची आवक परतीच्या पावसामुळे लांबणीवर पडली आहे. त्याची किरकोळ आवक राहिली. त्याला २५५० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाले. यातच बाजार समितीमध्ये मूग, उडीद, सोयाबीनला हमीभावापेक्षा कमीच दर राहिल्याचे चित्र गत आठवड्यातही कायम होते. ज्वारी (दादर)ची देखील किरकोळ आवक होती. गोदामांमध्ये व्यापाऱ्यांनी साठविलेल्या हरभऱ्याचीदेखील काहीशी आवक झाली. 

कांद्याचे दर वधारले. प्रति दिन १४० क्विंटल एवढी आवक राहिली. एवढीच आवक मागील महिन्यातही होती. परंतु, गत आठवड्यात दर किमान १६००, कमाल २६०० आणि सरासरी १८५० रुपये प्रतिक्विं टल एवढे होते. गवार शेंगा, कोथिंबीर, हिरवी मिरची यांचे दरही चढेच होते. १८०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिरचीला मिळाला. आवक प्रतिदिन ३४ क्विंटल, अशी होती. 

नवती केळीचे दर ८७५
रावेर (जि.जळगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केल्यानुसार नवती केळीचे दर गत आठवड्यात सरासरी ८५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. केळीची आवक कमी आहे, पण सणासुदीमुळे पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशातील मागणी कमी झाली. १२ ते १५ ऑक्‍टोबर यादरम्यान नवती केळीला प्रतिक्विंटल ९०० रुपये दर होता. तर १६ ऑक्‍टोबर रोजी ८७५ रुपये दर झाला. 

इतर ताज्या घडामोडी
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....