नगरमध्ये उडीद २२०० ते ३८५० रुपये

उडिद
उडिद

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील सप्ताहात उडदाची १५२९ क्विंटल आवक झाली. उडदाला २२०० ते ३८५० रुपयांचा दर मिळाला. मुगाची १ हजार ३११ क्विंटलची आवक होऊन ४४०० ते ५८०० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.  बाजार समितीत गत सप्ताहात ३६९ क्विंटल गावरान ज्वारीची आवक झाली, ज्वारीला १६५० ते २००० रुपयांचा दर मिळाला; तर बाजरीची १५५ क्विंटलची आवक होऊन ११७५ ते १७०१ चा दर मिळाला. तुरीची १३७ क्विंटलची आवक होऊन २७०० ते ४१०० रुपयांचा दर मिळाला. लाल मिरचीची ३२५ क्विंटलची आवक होऊन ४००० ते १०१०० रुपयांचा दर मिळाला. सोयाबीनची सातशे ८२ क्विंटलची आवक होऊन २३०० ते २९५० रुपयांचा दर मिळाला. गूळ डागाची ५ हजार २२७ क्विंटलची आवक होऊन २६०० ते ३८०० रुपयांचा दर मिळाला. भाजीपाल्यात टोमॅटोची ६६० क्विटंलची आवक होऊन प्रतिक्विंटलला ३०० ते १००० रुपये दर मिळाला. वांग्याची २११ क्विंटलची आवक होऊन २०० ते १००० दर मिळाला. फ्लाॅवरची ७२० क्विंटलची आवक होऊन २०० ते १२००, कोबीची २११ क्विटंलची आवक होऊन ४०० ते १५००, काकडीची २२८ क्विंटलची आवक होऊन ४०० ते १२००, गवारीची ४६ क्विटंलची आवक होऊन ३००० ते ६०००, भेंडीची १९० क्विटंलची आवक होऊन ८०० ते ३२००, बटाट्याची ६९० क्विंटलची आवक होऊन ३०० ते ६००.  लसणाची ५३ क्विटंलची आवक होऊन १००० ते ३५०० रुपये, हिरव्या मिरचीची २७८ क्विंटलची आवक होऊन १००० ते २३०० रुपये, शिमला मिरचीची २६६ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २२०० रुपये, तर वाटाण्याची ३७१ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ३५०० रुपयांचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com