युरियाची आयात ४२ लाख टनांवर

युरियाची आयात ४२ लाख टनांवर
युरियाची आयात ४२ लाख टनांवर

नवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील युरिया आयात नोव्हेंबर अखेरपर्यंत ४२.०३ लाख टनांवर पोचली आहे. या आयातीचा खर्च १ अब्ज डॉलरहून अधिक झाला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी दिली.  लोकसभेत लेखी उत्तरात रसायने व खते राज्यमंत्री राव इंद्रजीतसिंह म्हणाले, की सर्व खतांमध्ये केवळ युरियाच्या किंमतीवर सरकार नियंत्रण ठेवण्यात येते. याचबरोबर राज्य सरकारांच्या मालकीच्या कंपन्यांमार्फत युरियाची थेट आयात करण्यास परवानगी दिली जाते. ओमानमधून २० लाख टन युरिया आयात केला जात आहे. इफको आणि कृभको या कंपन्यांमार्फत ही आयात करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत ४२.०३ लाख टन युरियाची आयात करण्यात आली आहे. ही आयात एकूण १ हजार ४८ दशलक्ष डॉलरची आहे.

युरियाची आयात

वर्ष आयात (लाख टन) खर्च (दशलक्ष डॉलर) 
२०१५-१६ ८४.७३ २,०८७ 
२०१६-१७ ५४.८१ १,०४७ 
२०१७-१८ ५९.७५ १,२९५ 
२०१८-१९ ४२.०३ १,०४८ 

युरिया वगळता इतर खतांची आयात खुल्या सर्वसाधारण परवान्याच्या माध्यमातून विविध कंपन्या करतात. व्यावसायिक गरजांप्रमाणे या कंपन्या खतांची आयात करतात. त्यामुळे या आयातीची नेमकी आकडेवारी सरकार ठेवत नाही. - राव इंद्रजितसिंह, राज्यमंत्री, रसायने व खते   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com