agriculture news in marathi, Urea crosses 42 lakh ton import | Agrowon

युरियाची आयात ४२ लाख टनांवर
वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील युरिया आयात नोव्हेंबर अखेरपर्यंत ४२.०३ लाख टनांवर पोचली आहे. या आयातीचा खर्च १ अब्ज डॉलरहून अधिक झाला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी दिली. 

नवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील युरिया आयात नोव्हेंबर अखेरपर्यंत ४२.०३ लाख टनांवर पोचली आहे. या आयातीचा खर्च १ अब्ज डॉलरहून अधिक झाला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी दिली. 

लोकसभेत लेखी उत्तरात रसायने व खते राज्यमंत्री राव इंद्रजीतसिंह म्हणाले, की सर्व खतांमध्ये केवळ युरियाच्या किंमतीवर सरकार नियंत्रण ठेवण्यात येते. याचबरोबर राज्य सरकारांच्या मालकीच्या कंपन्यांमार्फत युरियाची थेट आयात करण्यास परवानगी दिली जाते. ओमानमधून २० लाख टन युरिया आयात केला जात आहे. इफको आणि कृभको या कंपन्यांमार्फत ही आयात करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत ४२.०३ लाख टन युरियाची आयात करण्यात आली आहे. ही आयात एकूण १ हजार ४८ दशलक्ष डॉलरची आहे.

युरियाची आयात

वर्ष आयात (लाख टन) खर्च
(दशलक्ष डॉलर) 
२०१५-१६ ८४.७३ २,०८७ 
२०१६-१७ ५४.८१ १,०४७ 
२०१७-१८ ५९.७५ १,२९५ 
२०१८-१९ ४२.०३ १,०४८ 

युरिया वगळता इतर खतांची आयात खुल्या सर्वसाधारण परवान्याच्या माध्यमातून विविध कंपन्या करतात. व्यावसायिक गरजांप्रमाणे या कंपन्या खतांची आयात करतात. त्यामुळे या आयातीची नेमकी आकडेवारी सरकार ठेवत नाही.
- राव इंद्रजितसिंह, राज्यमंत्री, रसायने व खते 

 

इतर अॅग्रोमनी
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...
हळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...
ग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...
युरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...
मका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...
कापसाचा लांबवरचा कल वाढताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस...
कापूस, हरभऱ्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
देशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा...जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता...
द्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात...मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले...