agriculture news in Marathi, urea scarcity in jalgaon, Maharashtra | Agrowon

नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

खते मागील दोन तीन दिवसांत अनेक कंपन्यांनी पाठविली आहे. जेथे टंचाई आहे तेथे ती पोचविण्याची कार्यवाही झाली आहे. पण मोठी टंचाई कुठेही नाही. युरियाही पुरेशा प्रमाणात मिळाला आहे. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.

जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने सरळ खतांची मागणी वाढली आहे. परंतु युरिया पुरेशा प्रमाणात मिळत नाही. शिवाय अनेक खत विक्रेते ई-पॉसचा वापर करीत नाहीत. तसेच जादा दरात युरियाची विक्री करीत असल्याचे प्रकार सुरू आहेत. गरज असते त्या वेळी नेमका युरिया उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. 

जिल्ह्यात सुमारे १००० खत विक्रेते आहेत. यातील सर्वांनाच ई-पॉस मशिनचे वितरण केले आहे. या मशिनमध्ये खते विक्रीची नोंद करून विक्री बंधनकारक आहे. याच मशिनमधून आलेले बिलही शेतकऱ्यांना द्यायच्या सूचना आहेत. परंतु जळगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, चोपडा, रावेर, यावल भागात अनेक खत विक्रेते फक्त प्रयोग म्हणून या मशिनचा वापर करतात.

पाच-दहा व्यवहार या मशिनचा वापर करून करतात. परंतु एरवी सर्रास खतांची विक्री करून पुस्तकातील पावत्यांच्या स्वरूपातील बिल शेतकऱ्यांना दिले जात आहे. युरियावर जामनेर, चाळीसगाव, अमळनेर भागात लिंकिंग सुरू आहे. १० गोण्यांवर एक ३०० ते ४०० रुपयांचे विद्राव्य खत किंवा इतर अन्नद्रव्ये शेतकऱ्यांच्या माथी मारतात. 

वाहतूक भाडेही वसूल
युरिया वाहतुकीसाठी काही ठिकाणी पाच रुपये, काही ठिकाणी दहा तर रावेर, चाळीसगाव, अमळनेरसाठी १५ रुपयांपर्यंत खर्च येतो. या भागात हे वाहतूक भाडे शेतकऱ्यांकडून वसूल केले जात आहे. बिलावर मात्र त्याची नोंद नसते. जिल्ह्यात काही कंपन्यांनी खतपुरवठा केला आहे. परंतु ग्रामीण भागापर्यंत अजून पुरेसा युरिया पोचला नाही. युरियाचा ५० टक्केच पुरवठा झाल्याची माहिती आहे, तर संयुक्त खतांचा मिळून ६४ टक्‍क्‍यांपर्यंत पुरवठा झाला आहे. सुपर फॉस्फेट, पोटॅशचा पुरवठा ५० टक्‍क्‍यांवर झाला आहे, अशी माहिती मिळाली. 

 

इतर अॅग्रो विशेष
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...