agriculture news in marathi, urge to make licenses online | Agrowon

सावकारी परवाने ऑनलाइन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जानेवारी 2018

नागपूर : राज्यातील सावकारी व्यवहारासंदर्भाने होणारे सर्व व्यवहार तसेच परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया ऑनलाइ्रन करावी, अशी मागणी सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली.

नागपूर : राज्यातील सावकारी व्यवहारासंदर्भाने होणारे सर्व व्यवहार तसेच परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया ऑनलाइ्रन करावी, अशी मागणी सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली.

निवेदनानुसार, राज्यात आजमितीस दहा ते बारा हजार परवानाधारक सावकार आहेत. मुंबई सावकारी कायद्यातील परवाने, सावकारी कायदा 2014 चे कलम 57 (2) नुसार नियमीत करण्यात आले आहेत. या सावकारांना शासनाने तारणी व विनतारणी कर्ज वाटप करण्याचे अधिकार दिले आहे. सावकारी कायदा 2014 चे कलम 24 व 25 नुसार परवानाधारक सावकाराने हिशेब ठेवणे, शासनास लेखी विवरणपत्राच्या प्रती देणे बंधनकारक केले आहे. कलम 31 नुसार व्याजाच्या दरावरील मर्यादा ठरवून दिल्या आहेत. परवानाधारक सावकाराने कलम 24 व 25 चे उल्लंघन केल्यास कलम 43 मध्ये दंडाची तरतूद आहे. तसेच कोणतीही व्यक्‍ती सावकारी कायद्याचे तरतुदीचे उल्लंघन करीत असल्यास अशा व्यक्‍तीस दोन वर्षे शिक्षा व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा आहे.

राज्यात सद्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी परवानाधारक सावकारांकडून सोनेतारण ठेवून कर्ज उचल करीत असतात. बहुतांश सावकार हे नियम 19 नुसार भांडवलखाते कमी रकमेचे दाखवून मोठ्या प्रमाणावर कर्ज व्यवहार करतात. हे कर्ज व्यवहार कच्च्या चिठ्ठ्यांवर दाखवून केले जात आहे. त्यामुळे शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना कलम 25 नुसार पासबुकाची प्रत पुरविली जात नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य व केंद्र शानाने सर्व व्यवहार ऑनलाइन व कॅशलेसद्वारे करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सावकारग्रस्त शेतकरी समितीचे प्रदेशाध्यक्ष अरुण इंगळे, फुलचंद पाटील, विशाल बावस्कर, विनोद गहेरवार यांनी ही मागणी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...