Agriculture News in Marathi, US agricultural exports to India have grown | Agrowon

अमेरिकेतून भारतात कृषी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ
वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017
वाॅशिंग्टन, अमेरिका ः गेल्या दशकात अमेरिकेतून भारतात कृषी उत्पादनांच्या निर्यातीत २५० टक्क्यांनी वाढ झाली अाहे, अशी माहिती अमेरिकेच्या कृषी खात्यातील अधिकाऱ्याने दिली अाहे.
 
अमेरिकेच्या कृषी खात्यातील व्यापार अाणि विदेश कृषी व्यवहार विभागाचे अवर सचिव टेड मॅककिन्नी सोमवार(ता. ३०)पासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत अाहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारतात होणाऱ्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीत मोठी वाढ झाल्याची माहिती दिली अाहे.
 
वाॅशिंग्टन, अमेरिका ः गेल्या दशकात अमेरिकेतून भारतात कृषी उत्पादनांच्या निर्यातीत २५० टक्क्यांनी वाढ झाली अाहे, अशी माहिती अमेरिकेच्या कृषी खात्यातील अधिकाऱ्याने दिली अाहे.
 
अमेरिकेच्या कृषी खात्यातील व्यापार अाणि विदेश कृषी व्यवहार विभागाचे अवर सचिव टेड मॅककिन्नी सोमवार(ता. ३०)पासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत अाहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारतात होणाऱ्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीत मोठी वाढ झाल्याची माहिती दिली अाहे.
 
श्री. मॅककिन्नी यांचा हा पहिला विदेश दौरा अाहे. त्यांच्यासोबत ५० उद्योजक, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी भारत दौऱ्यावर येत अाहेत. भारतात होणाऱ्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीत अाणखी वाढ व्हावी, या हा दौऱ्याचा उद्देश अाहे.
 
गेल्या दशकात अमेरिकेतून भारतात होणाऱ्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली असली तरी अजून अनेक उत्पादनांच्या निर्यातीबाबत अडथळे अाहेत, असेही श्री. मॅककिन्नी यांनी नमूद केले अाहे.
 
‘‘अमेरिकेसाठी भारत हा जगातील महत्त्वाची बाजारपेठ अाहे. पाच दिवसांच्या दौऱ्यात अमेरिकेतील कृषी उत्पादनांना भारतातील बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा अामचा प्रयत्न अाहे. तसेच भारतासोबत होणाऱ्या व्यापाऱ्यात सुधारणा व्हावी, यावर चर्चा होणार अाहे,’’ असे श्री. मॅककिन्नी यांनी सांगितले.
 
अमेरिकेतून कृषी निर्यात १.३ अब्ज डॉलरवर
अमेरिकेतून भारतात होणाऱ्या कृषी उत्पादनांची निर्यात २०१६ मध्ये १.३ अब्ज डॉलरवर पोचली अाहे. त्यात कापूस, कडधान्ये, ताजी अाणि प्रक्रियायुक्त फळे अादींचा ८० टक्के समावेश अाहे. अमेरिकेतील इथेनाॅल निर्यातीसाठी भारत ही मोठी बाजारपेठ बनली अाहे. अमेरिकेतून भारतात २०१६ मध्ये सुमारे १७६ डॉलर किमतीचा इथेनॉल पुरवठा करण्यात अाला अाहे, अशी माहिती मिळाली अाहे.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...