agriculture news in marathi, Use balanced fertilizers | Agrowon

खतांचा संतुलित वापर करावा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

परभणी ः पावसाच्या आगमनानुसार आपत्कालीन पीक नियोजन करणे आवश्यक आहे. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी खतांचा संतुलित वापर करावा. कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. उत्पादन खर्च कमी करून शेती व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी विद्यावेत्ता डाॅ. आनंद गोरे यांनी केले.

परभणी ः पावसाच्या आगमनानुसार आपत्कालीन पीक नियोजन करणे आवश्यक आहे. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी खतांचा संतुलित वापर करावा. कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. उत्पादन खर्च कमी करून शेती व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी विद्यावेत्ता डाॅ. आनंद गोरे यांनी केले.

दूधगांव (ता. जिंतूर) येथे बुधवारी (ता. २०) अॅग्रोवन तर्फे आयोजित महाधन प्रायोजित खरिपपूर्व नियोजन या विषयावरील अॅग्रोवन संवाद चर्चासत्रामध्ये डाॅ. गोरे बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी दशरथराव पुंड होते. महाधनचे वरिष्ठ व्यवस्थापक ए. बी. सय्यद, अभिनय राऊत, दशरथराव जाधव, माधवराव राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

डाॅ. गोरे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. जमिनीची नांगरट वेळेवर करून पेरणी केल्यास पिकांवर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी पिकांचा फेरपालट महत्त्वाचा आहे. योग्य वाणांची निवड करावी. सोयाबीन, मूग, उडिद, तूर या पिकांच्या पेरणीपूर्वी नत्र, पालाश, स्फुरद स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूसंवर्धकांची तसेच बुरशी नाशकांची बीजप्रकिया करावी. पावसाच्या खंड काळात संरक्षित पाणी दिले तर उत्पादनात घट येत नाही. त्यासाठी उपलब्ध पाण्याचा ठिबक, तुषार संचाद्वारेच काटेकोर वापर करावा. पाण्याची बचत करून पावसाच्या खंडकाळात संरक्षित पाणीपाळी देण्यासाठी ते राखून ठेवावे. हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये. पाऊस लांबला आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजन करा. शाश्वत उत्पन्नासाठी शेतीपूरक व्यवसायाची जोड द्यावी. श्री. सय्यद यांनी महाधनच्या उत्पादनांची माहिती दिली.

प्रास्ताविक अॅग्रोवनचे बातमीदार माणिक रासवे यांनी केले. सूत्रसंचालन अॅग्रोवनचे वितरण प्रतिनिधी भास्कर काळे यांनी केले. तर सकाळ अॅग्रोवनचे वितरक वैजनाथ पारवे यांनी आभार मानले.

 

इतर ताज्या घडामोडी
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...