agriculture news in marathi, Use of deep teelage for Soil | Agrowon

खोल मशागतीतून जमीन मोकळी करण्याकडे कल
ज्ञानेश उगले
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

नाशिक : लागवडीसाठी जमीन तयार करणे, हा द्राक्षपट्ट्यात परवलीचा मंत्र ठरू लागला आहे. पोकलँड यंत्रापुढे दीड मीटरपर्यंत खोल जाणाऱ्या दात्यांनी संपूर्ण जमीन विंचरून काढली जाते. यामुळे जमिनीत वर्षानुवर्षे तयार झालेले क्षारांचे पट्टे मोकळे होऊन जमिनीत हवा खेळती रहाण्यास मदत होत आहे. चर्चासत्रांमध्ये जागतिक पातळीवरील द्राक्ष तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना जमीन मोकळी करण्यावर भर दिला आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून नाशिक, सांगली, पुणे, सोलापूर या विभागांत द्राक्ष लागवडीअगोदर खोल मशागत करून जमीन मोकळी करण्याकडे कल वाढला आहे. 

नाशिक : लागवडीसाठी जमीन तयार करणे, हा द्राक्षपट्ट्यात परवलीचा मंत्र ठरू लागला आहे. पोकलँड यंत्रापुढे दीड मीटरपर्यंत खोल जाणाऱ्या दात्यांनी संपूर्ण जमीन विंचरून काढली जाते. यामुळे जमिनीत वर्षानुवर्षे तयार झालेले क्षारांचे पट्टे मोकळे होऊन जमिनीत हवा खेळती रहाण्यास मदत होत आहे. चर्चासत्रांमध्ये जागतिक पातळीवरील द्राक्ष तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना जमीन मोकळी करण्यावर भर दिला आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून नाशिक, सांगली, पुणे, सोलापूर या विभागांत द्राक्ष लागवडीअगोदर खोल मशागत करून जमीन मोकळी करण्याकडे कल वाढला आहे. 

पिंपळगाव बसवंत येथील प्रयोगशील द्राक्ष बागायतदार अनंत मोरे म्हणाले, की गेल्या काही वर्षांत द्राक्ष शिवारात लागवडीची पद्धत बदलली आहे. पहिल्यांदा जमिनीची हलकी मशागत केल्यानंतर नांगराचे तास आणि चर पाडून ठराविक अंतराने खड्डे करून रोप लागवडीची पद्धत होती. त्यामुळे झाडाची मुळी खोलवर न जाता उथळ राहते. परिणामी मुळीच्या वाढीला मर्यादा येतात. त्याचा परिणाम उत्पादनक्षमतेवर होतो. 

      एकाच जमिनीत हंगामानुसार वेगवेगळी पिके घेतली जातात. त्या पिकांच्या मुळांच्या रचनेनुसार सिंचन पद्धती बदलली जाते. त्याच्या परिणामी जमिनीच्या प्रत्येक थरात क्षारांचे पट्टे तयार होतात. क्षारांच्या अडथळ्यामुळे पाणी खोलपर्यंत झिरपण्याला मर्यादा आली आहे. क्षारांच्या अडथळ्यांमुळे पुरेसा ऑक्‍सिजन मुळांपर्यंत जात नाही. जमिनीत हवा खेळती रहात नाही. हे लक्षात घेता क्षारांचे थर फोडून जमीन सच्छिद्र करणे महत्त्वाचे अाहे. पोकलँडच्या पुढे एक ते दीड मीटरपर्यंतचे दाते जोडून संपूर्ण जमीन उभी- आडवी खोल नांगरल्यामुळे क्षारांचे थर मोकळे होतात. मागील दोन वर्षांपासून शेतकरी या नव्या मशागत तंत्रज्ञानाकडे वळले आहेत.

   गेल्या काही वर्षांपासून राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या चर्चासत्रात चिली, दक्षिण अफ्रिका, पेरू, अमेरिकेतील द्राक्ष तज्ज्ञांनी ‘जमिनीचे आरोग्य’ या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे. बहुतांश बागायतदारांना कमी उत्पादनाची समस्या जाणवत आहे. यामुळे बागायतदारांनी जमीन व्यवस्थापनाकडे लक्ष देण्यास सुरवात केली. मागील आणि यंदाच्या द्राक्ष लागवड हंगामात बागायतदारांमध्ये नवीन मशागत तंत्रज्ञानाची चर्चा रंगली. विदेशातील द्राक्ष तज्ज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञ आणि राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी नाशिक, सांगली भागात अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग घेतले. यातून क्षार तसेच इतर कारणांनी कडक झालेल्या जमिनीची खोल मशागत करून मोकळी करण्याची आणि नवी सिंचन पद्धती बसविण्याची गरज आहे, हे समोर आले. या प्रयोगांचे सकारात्मक परिणाम समोर येत असताना यंदा होणारी बहुतांश लागवड नव्या मशागत तंत्रज्ञानाच्या साह्याने होत आहे.

मशागत तंत्रज्ञानात चिली अग्रेसर 
चिलीमध्ये मागील अनेक वर्षांपासून खोल मशागत केल्यानंतर जमीन तयार करून मगच द्राक्ष लागवड केली जाते. चिली येथील द्राक्ष तज्ज्ञ ऑस्कर सलगाडो यांनी सुरवातीला भारतीय द्राक्ष उत्पादकांना या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. संघाच्या चर्चासत्रात अनेकदा यावर त्यांनी सादरीकरण केले. चिली येथील रॉड्रिगो ऑलिव्ह यांनी ‘जमिनीचे आरोग्य आणि  त्यासाठी योग्य सिंचन पद्धती'' यावर विशेष भर दिला आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत द्राक्ष उत्पादन १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढल्याचे बागायतदार सांगतात.

चिली, दक्षिण अफ्रिकेतील खोल मशागत तंत्रज्ञानाने भारतीय द्राक्ष बागायतदारांना नवा दृष्टिकोन दिला आहे. यामुळे या आधीच्या तुलनेने कमी खर्चात द्राक्षाची चांगली गुणवत्ता मिळणे शक्‍य झाले आहे.
- अशोक गायकवाड,
माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे

जमिनीची तयारी हा दर्जेदार द्राक्ष उत्पादनाचा पाया आहे. सक्रिय आणि मजबूत मुळीचे आरोग्य अबाधित ठेवणे, पाण्याचा गरजेनुसार वापर यावर बागायतदार भर देत आहेत. खोल मशागत तंत्रज्ञानाने द्राक्ष शेतीला नवी दिशा मिळाली आहे.
- सुभाष आर्वे,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे
 

इतर सेंद्रिय शेती
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
स्थानिक जातींची सेंद्रिय पद्धतीने लागवड...संकरीत जाती आणि रसायनांचा वापर यामुळे शेतकऱ्यांना...
बायोडायनॅमिक शेती पद्धतीचे महत्त्व,...बायोडायनामीक शेती पद्धतीचे उद्गाते डॉ. रुडॉल्फ...
बायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...
शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
आच्छादनासह गांडूळखत वापरातून वाढवा...सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीवर आच्छादन, गांडूळखताची...
जमिनीत वाढवा सेंद्रिय घटकसेंद्रिय कर्बामुळे जमिनीत योग्य प्रमाणात हवा आणि...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
जमिनीचा पोत वाढवण्यासाठी हिरवळीची खतेहिरवळीच्या खताचा अधिक फायदा मिळण्यासाठी या पिकाचे...
जमिनीच्या सुपीकतेसाठी वापरा हिरवळीची खतेशेतीमध्ये रासायनिक घटकांचा वापर वाढत चालला असून,...
पुण्यातील भिडे यांनी केले मातीला ‘कर्ब... पुणे : पुणे येथील सुनील भिडे यांनी दक्षिण...
मानवी आरोग्यासाठी मातीच्या आरोग्याकडे...मे महिन्याचा दुसरा रविवार हा जागतिक मातृदिन...
टिकवून ठेवा जमिनीची सुपीकताजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे....