कापसात एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धत वापरा ः कल्याणकर

कापसात एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धत वापरा ः कल्याणकर
कापसात एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धत वापरा ः कल्याणकर

नांदेड  ः कापूस आणि सोयाबीनवरील किडींसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन पोखर्णी (ता. नांदेड) येथील कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण तज्ज्ञ एम. जी. कल्याणकर यांनी केले.

‘अॅग्रोवन’ आणि ‘महाधन’ यांच्यातर्फे पांढरवाडी (ता. मुदखेड) येथे अॅग्रोवन संवाद चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्षस्थानी उपसभापती आनंदराव गादीलवाड होते. गोपाळ पाटील इजळीकर, महाधनचे डी.जी.एम. सुदर्शन सोनवणे, रमेश सोनवणे, बालाजी मंगरुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी श्री. कल्याणकर म्हणाले की, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अोळखून त्यानुसार अन्नद्रव्यांचे नियोजन करावे. सोयाबीनवरील चक्री भुंगा, पाने खाणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी यांची आर्थिक नुकसान पातळी ओळखावी. कापूस आणि सोयाबीनवर जुलै, आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर किडी येतात. कपाशीचे पीक ४५ दिवसांचे झाल्यानंतर त्यामध्ये कामगंध सापळे लावावेत. शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करताना सुरक्षा किटचा वापर करावा.

श्री. सोनवणे यांनी महाधनच्या विविध खतांबाबत माहिती दिली. या वेळी प्रयोगशील शेतकरी गोविंदराव नव्हाटे, माणिकराव कातेमवाड, दिगंबर यरमाड, रंगराव लाडाजी, बाबूराव शिंगेवाड, गोविंदराव गवंडेवाड, मारोती खांडरे, दगडोजी धोंडगे यांचा अॅग्रोवनतर्फे सत्कार करण्यात आला. गंगाधर खांडरे, लक्ष्मण नव्हाटे, शिवाजी आकमवाड, मारोती आकमवाड, गंधार कोटगिरे, प्रमोद यरमाड, शेषराव काटगिरे, आनंदा कल्याणकर आदी उपस्थित होते. सकाळ-अॅग्रोवनचे वितरक बालाजी अन्नपूर्णे यांनी सहकार्य केले. अॅग्रोवनचे वितरण प्रतिनिधी सुनील पतंगे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com