agriculture news in Marathi, Use neem tree for pest management | Agrowon

कीड व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काचा वापर करा : चलवदे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 मे 2019

नांदेड ः निरोगी मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा अंवलंब करणे गरजेचे आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काचा प्राधान्याने वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी शनिवारी (ता. २५) केले.

नांदेड ः निरोगी मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा अंवलंब करणे गरजेचे आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काचा प्राधान्याने वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी शनिवारी (ता. २५) केले.

कृषी विभागातर्फे शनिवार (ता. २५) ते ७ जून या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ पंधरावाड्याचे उद्‍घाटन पिंपळगाव (ता. नांदेड) येथे शनिवारी (ता. २५) श्री. चलवदे यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. सरपंच आनंदराव डक अध्यक्षस्थानी होते. अध्यक्ष प्रताप पाटील पुंड, तालुका कृषी अधिकारी विनायक सरदेशपांडे, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील, एस. जी. चामे, पर्यवेक्षक वसंत जारिकोटे, कृषी सहायक सुरेखा शिंदे, सोनाली शिंदे, प्रीती गवळी, वनिता सर्वज्ञ आदी उपस्थित होते. 

श्री. चलवदे पुढे म्हणाले, ‘‘सेंद्रिय शेती पद्धतीसाठी शेणखत, गोमूत्र यांचा वापर महत्त्वाचा आहे. त्यासाठी देशी गायींचे संगोपन करावे लागणार आहे. सेंद्रिय निविष्ठांच्या वापरामुळे शेती रसायनमुक्त होईल. रसायमुक्त शेती उत्पादनाच्या वापरामुळे मानवी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.’’

या वेळी कृषी विभागाच्या योजना, शेती शाळा संकल्पना, बीजप्रक्रिया, बियाणे उगवणशक्ती चाचणी प्रयोग, पेरणीसाठी जमीन तयार करणे, रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान आदींबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. सूत्रसंचालन श्री. जारिकोटे यांनी केले. तर शेखर कदम यांना आभार मानले. नामदेव डक, मोरोती डक, पंडित डक, मधुकर पुंड, भगवान पुंड, मालोजी डक, संजय डक, कल्याण पुंड आदींनी पुढाकार घेतला. या वेळी शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

‘ॲग्रोवन’च्या विशेषांकाचे वाटप
या कार्यक्रमामध्ये ‘अॅग्रोवन’च्या खरीप हंगाम नियोजन विशेषांकाचे वाटप करण्यात आले. तसेच निंबोळी अर्क या माहितीपत्रकाचे विमोचन करून वाटप करण्यात आले.

इतर बातम्या
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे...अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी...
बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन...भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या...
नगर जिल्ह्यात  ‘उन्नत शेती’बाबत...नगर ः शेतकऱ्यांना अवजारांचा लाभ मिळण्यासाठी...
मराठवाड्यातील १९८ मंडळांत पाऊसऔरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर...
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत...जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव,...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब लागवड मोठ्या...
सांगली जिल्ह्यात पाऊस बरसलासांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी...
सोलापुरात पाऊस; पण जोर कमीसोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे...
मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज...आळंदी, जि. पुणे  ः  सुखालागी जरी करिसी...
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम...मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ....
ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटीपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप...
पुणे जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात...पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या...
‘जलयुक्त’मधील गैरव्यवहाराची ‘एसीबी’...मुंबई  ः राज्यात जलयुक्त शिवार अभियानातील...