उत्तर प्रदेशातील ११ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ

उत्तर प्रदेश शेतकरी
उत्तर प्रदेश शेतकरी

लखनौ, उत्तर प्रदेश ः पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचा उत्तर प्रदेशमधील ११ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला अाहे. उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी केली अाहे. पहिल्या टप्प्यात ७,३७१ कोटींचे कर्ज माफ झाले अाहे, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात अाली अाहे.

विशेषतः पहिल्या टप्प्यात छोट्या अाणि सिमांत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला अाहे. राज्यातील ४,८१४ शेतकऱ्यांचे १ ते १०० रुपयांचे, ६,८९५ शेतकऱ्यांचे १०० रुपये ते ५०० रुपयांपर्यंतचे, ५,५५३ शेतकऱ्यांचे ५०० ते १ हजार रुपयांपर्यंतचे तर ४१,६९० शेतकऱ्यांचे १ हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात अाले अाहे. तर ११ लाख २७,८९० शेतकऱ्यांचे दहा हजार अाणि त्यावरील कर्ज माफ झाल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात अाले अाहे.

उत्तर प्रदेश योगी अादित्यनाथ यांच्या सरकारने सत्तेवर येताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. यामुळे प्रति शेतकरी एक लाखांपर्यंतचा लाभ शेतकऱ्यांना मिळत अाहे.

उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील कर्जमाफी

  • शेतकरी....थकित कर्ज रक्कम
  • ४,८१४...१ ते १०० रुपये
  • ६,८९५...१०० ते ५०० रुपये
  • ५,५५३...५०० ते १ हजार रुपये
  • ४१,६९०...१ हजार ते दहा हजार रुपये
  • ११,२७,८९०...दहा हजार अाणि त्यावरील रक्कम
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com