Agriculture News in Marathi, Uttar Pradesh government has plans to set up mega mandis, India | Agrowon

उत्तर प्रदेशमध्ये उभारणार मोठ्या कृषी बाजार समित्या
वृत्तसेवा
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

लखनौ, उत्तर प्रदेश ः शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूक, त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच किफायतशीर दर मिळावा, या उद्देशाने मोठ्या कृषी बाजार समित्या उभारण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला अाहे.

अशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या (एडीबी) सहकार्याने मोठ्या बाजार समित्या उभारण्यात येणार अाहेत. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री योगी अादित्यनाथ यांनी मोठ्या बाजार समित्या उभारण्यासाठी चार ते पाच जागा निश्चित करण्याचे निर्देश सरकारी अधिकाऱ्यांना दिले अाहेत.

लखनौ, उत्तर प्रदेश ः शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूक, त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच किफायतशीर दर मिळावा, या उद्देशाने मोठ्या कृषी बाजार समित्या उभारण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला अाहे.

अशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या (एडीबी) सहकार्याने मोठ्या बाजार समित्या उभारण्यात येणार अाहेत. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री योगी अादित्यनाथ यांनी मोठ्या बाजार समित्या उभारण्यासाठी चार ते पाच जागा निश्चित करण्याचे निर्देश सरकारी अधिकाऱ्यांना दिले अाहेत.

मोठ्या बाजार समित्या उभारण्याबाबत मुख्यमंत्री अादित्यनाथ अाणि एडीबी बॅंकेच्या अधिकाऱ्यांबरोबर शुक्रवारी (ता.२४) बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात अाला अाहे.

प्रस्तावित मोठ्या बाजार समितीमध्ये गोदामे, शीतगृहे उभारण्यात येणार अाहे. यामुळे शेतकऱ्यांना अापल्या शेतमालाची साठवणूक करता येईल. बाजारातील गरजेनेनुसार शेतकऱ्यांना गोदाम अाणि शीतगृहात साठवणूक केलेला शेतमाल नेऊन विकता येईल, अशी व्यवस्था उभारायला हवी.

जेणेकरून शेतकऱ्यांना मध्यस्थांचा अडथळा होणार नाही. मध्यस्थांकडून होणारी फसवणूक थांबेल. तसेच बाजारातील दराचा अंदाज घेऊन शेतमाल विकता येईल. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालास किफायतशीर दर मिळेल, असे मुख्यमंत्री अादित्यनाथ यांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना म्हटले अाहे.

शेतकरी पूरक असलेल्या बाजार समित्या उभारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न अाहे. त्यासाठी गरज पडल्यास उत्तर प्रदेश राज्य बाजार समिती कायद्यात दुरुस्ती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मोठ्या बाजार समित्यांबरोबरच राज्यात अाधुनिक डेअरी उद्योग उभारण्याची गरज अाहे. राज्यातील विविध भागात ३१ मार्च २०१८ पूर्वी १४ अाधुनिक डेअरी उभारण्यात येतील. यामुळे रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले अाहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२० पर्यंत दुपटीने वाढविण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध अाहे. त्यासाठी राज्य सरकारकडून शेतकरीहिताचे धोरण राबविले जात असल्याचे मुख्यमंत्री अादित्यनाथ यांनी सांगितले.

मोठ्या बाजार समित्यामध्ये गोदामे, शीतगृहे उभारण्यात येतील. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची साठवणूक करता येईल. बाजारातील गरजेनुसार, दराचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना अापला शेतमाल विकता येईल. यामुळे मध्यस्थांकडून होणारी फसवणूक थांबेल अाणि शेतमालास किफायतशीर दर मिळेल.
- योगी अादित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...