agriculture news in marathi, vacancies empty in agriculture department, akola, maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यातील कृषी विभागात १०६ पदे रिक्त
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

अकोला : जिल्ह्यात कृषी विभागात शंभरावर विविध पदे रिक्त असल्याने त्याचा दैनंदिन कामकाजासह योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होत अाहे. अकोटमध्ये तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार द्यायलासुद्धा समकक्ष अधिकारी उपलब्ध नसल्याने कृषी सहायकाला हा चार्ज देण्याची वेळ अाल्याचे प्रकरण राज्यभर गाजले.

अकोला : जिल्ह्यात कृषी विभागात शंभरावर विविध पदे रिक्त असल्याने त्याचा दैनंदिन कामकाजासह योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होत अाहे. अकोटमध्ये तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार द्यायलासुद्धा समकक्ष अधिकारी उपलब्ध नसल्याने कृषी सहायकाला हा चार्ज देण्याची वेळ अाल्याचे प्रकरण राज्यभर गाजले.

जिल्ह्याच्या कृषी विभागात तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक अशी एकूण ३५१ पदे अाहेत. यापैकी २४५ पदे भरलेली असून तब्बल १०६ पदे रिक्त अाहेत.
 
या रिक्त असलेल्या पदांमध्ये प्रामुख्याने थेट शेतकऱ्यांशी संपर्क असणारी कृषी सहायकाची ६४ तर पर्यवेक्षकाची १७ पदे भरलेली नाहीत. मंडळ कृषी अधिकारी या पदाचीही अशीच स्थिती अाहे. मंजूर असलेल्या १९ पैकी १२ पदे रिक्त अाहेत.
 
जिल्ह्यात सात तालुके असून त्यापैकी केवळ तीन ठिकाणी पूर्ण वेळ तालुका कृषी अधिकारी अाहेत. उर्वरित चार ठिकाणचा पदभार देऊन कार्यालयाचे कामकाज केले जात अाहे. बाळापूरसारखा तालुका तर वर्षानुवर्षे मंडळ अधिकारी सांभाळत अाहेत. अशीच अवस्था बार्शिटाकळीची होती. तेथे अाता पूर्ण वेळ अधिकारी नेमण्यात अाला. तेल्हारा तालुक्यात पात्र अधिकारी मिळत नाही. अकोटमध्ये तर पदभार घेण्यासाठी कर्मचारी नाहीत, एवढी बिकट परिस्थिती तयार झाली अाहे. मूर्तिजापूर तालुक्याचीही स्थिती वेगळी नाही.
 
राज्याच्या नकाशावर कृषी क्षेत्रात अकोला मुख्य ठिकाण अाहे. या जिल्ह्यात खारपाणपट्टा असल्याने शेतीच्या समस्या वेगळ्या अाहेत. असे असताना वर्षानुवर्षे अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त ठेवली जात अाहेत. याबाबत कृषी विभाग, लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणी करूनही पदे भरली जात नसल्याने एकूणच योजनांच्या अंमलबजावणीसाठी मोठी अोढाताण सुरू अाहे.
 
अकोट तालुक्यात तर योजनांचा पार बोऱ्या वाजला. तेथील अहवालच जिल्हा मुख्यालयात पाठवायला कुणी नाही. गत काळात झालेल्या बदल्यांमध्ये काही तालुका कृषी अधिकारी  जिल्ह्याला मिळाले. दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकारी बदलीवर अकोला जिल्ह्यात येणार होते. परंतु सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी रिलीव्हर नसल्याने तेथील वरिष्ठ अधिकारी त्यांना सोडायला तयार नाहीत.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...