agriculture news in marathi, vaccination tender to be reintroduce | Agrowon

लाळ्या खुरकूत लसीसाठी फेरनिविदा प्रकिया सुरू
वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

मुंबई : उच्चाधिकार समितीच्या निर्णयानुसार लाळ्या खुरकूत लसींच्या खरेदीबाबत यापूर्वी राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश पशुसंवर्धन आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार अल्पकालीन फेरनिविदा प्रक्रिया तातडीने राबवून लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिली आहे.

मुंबई : उच्चाधिकार समितीच्या निर्णयानुसार लाळ्या खुरकूत लसींच्या खरेदीबाबत यापूर्वी राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश पशुसंवर्धन आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार अल्पकालीन फेरनिविदा प्रक्रिया तातडीने राबवून लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिली आहे.

२०१७-१८ मध्ये लाळ्या खुरकूत रोगमुक्त पट्टा निर्माण करणे या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लसीकरण कार्यक्रमासाठी पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामार्फत ४ मे २०१७ पासून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. निविदा प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे फेरनिविदा अथवा मुदतवाढ दिल्यामुळे प्रक्रिया अधिक कालावधीपर्यंत चालू राहिली. तथापि ४ ते १४ ऑगस्ट २०१७ या कालावधीतील निविदा प्रक्रियेमध्ये इंडियन इम्युनोलॉजिकल्स लि., हैदराबाद या कंपनीचे दर कमीत कमी आल्याने तसा प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. मात्र या कंपनीने २०१६-१७ मधील लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक लस खरेदी प्रक्रियेमध्ये निविदा सूचनेतील अटी व शर्तींचा भंग केल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. 

दरम्यान या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात रिट दाखल केली. उच्च न्यायालयाने शासनाच्या निर्णयास कोणतीही स्थगिती न देता याचिका निकाली काढली. लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरणाची तातडीची गरज लक्षात घेऊन २७ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीसाठी अल्पकालीन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. 

निविदा प्रक्रियेमध्ये इंडियन इम्युनोलॉजिकल्स लि., बायोवेट कंपनी व ब्रिलियंट फार्मा या देशातील लस निर्मिती करणाऱ्‍या तीनही कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. मात्र, निविदा प्रक्रियेमध्ये बायोवेट कंपनीचे दर कमीत कमी आल्याने शासनाने त्यांचे दर मान्य केले.

 दरम्यान इंडियन इम्युनोलॉजिकल्स लि.ने या निविदा प्रक्रियेबाबत उद्योग संचालनालयास निवेदन दिले. त्यावर राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेच्या मान्यतेसाठी उच्चाधिकार समितीची मान्यता घेण्याच्या सूचना उद्योग संचालनालयाने पशुसंवर्धन आयुक्तांना दिल्या.

डिसेंबरमध्ये उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित करण्यात आली व समितीने लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लस खरेदी ही तातडीची बाब असल्याचे मान्य केले. तातडीचा आदेश खरेदी प्रक्रियाअंतर्गत ई-निविदेद्वारे लस खरेदीस समितीने मान्यता दिली. तथापि, यापूर्वी करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेसाठी कार्योत्तर मंजुरी देण्याची तरतूद नियम पुस्तिकेत नसल्याने २७ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीतील तातडीचा खरेदी आदेश प्रक्रियेचा कालावधी वापरून केलेल्या निविदा प्रक्रियेस कार्योत्तर मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे उच्चाधिकार समितीच्या निर्णयानुसार या कालावधीत राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करून उच्चाधिकार समितीने दिलेल्या मान्यतेनुसार फेरनिविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश २४ जानेवारी २०१८ रोजी आयुक्त पशुसंवर्धन यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार अल्पकालीन फेरनिविदा प्रक्रिया तातडीने राबवून लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे.

दरम्यान २०१७-१८ मध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांत बीड, उस्मानाबाद, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखाने क्षेत्र, ऊसतोडीसाठी स्थलांतरित होणारी जनावरे, तसेच राज्याच्या सीमावर्ती भागातील जनावरांना लसीकरण करण्यासाठी ५ लाख २३ हजार लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच, नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद स्वनिधीतून ७१ हजार ८४ लाळ खुरकूत रोगप्रतिबंधक लस मात्रा खरेदी करण्यात आलेल्या आहेत, असेही विभागाने कळविले आहे.

इतर अॅग्रो विशेष
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...