agriculture news in marathi, Valuation of Agriculture Science Center work by Niti Commission' | Agrowon

'निती आयोगाद्वारे कृषी विज्ञान केंद्राच्या कामाचे मूल्यमापन'
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

जालना : शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गृह विज्ञान तज्ज्ञांना अधिक जोमाने काम करावे लागेल. आपल्या कामात शास्त्रीय दृष्टिकोन अंगीकारून आपली क्षमता सिद्ध करावी लागेल. निती आयोगाद्वारे देशभरातील कृषी विज्ञान केंद्रांचे मूल्यमापन केले जात असल्याचे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक उपमहानिदेशक (कृषी विस्तार) डॉ. व्ही. पी. चहल यांनी स्पष्ट केले.

जालना : शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गृह विज्ञान तज्ज्ञांना अधिक जोमाने काम करावे लागेल. आपल्या कामात शास्त्रीय दृष्टिकोन अंगीकारून आपली क्षमता सिद्ध करावी लागेल. निती आयोगाद्वारे देशभरातील कृषी विज्ञान केंद्रांचे मूल्यमापन केले जात असल्याचे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक उपमहानिदेशक (कृषी विस्तार) डॉ. व्ही. पी. चहल यांनी स्पष्ट केले.

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी तंत्रज्ञान वापर संशोधन संस्था (अटारी) पुणे आणि कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्‍त विद्यमाने राज्यातील कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत असलेल्या गृह विज्ञान तज्ज्ञांचे तीन दिवसांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण नुकतेच आयोजित केले गेले. त्याच्या उद्‌घाटनपर सत्रात डॉ. चहल बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्रकल्प संचालक विजयअण्णा बोराडे, तर अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, परभणी येथील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. हेमांगिनी सरंबेकर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रशिक्षणात राज्यभरातून आलेल्या २७ प्रशिक्षणार्थींचा सहभाग आहे.

डॉ. चहल म्हणाले, भविष्यात महिलांसाठी नारी वाटिका, संपदा यांसारखे महत्त्वाकांक्षी उपक्रम शासन आखत आहे. तसेच जालन्याच्या कृषी विज्ञान केंद्रासह, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, सीड हब आदीसंदर्भातील काम चांगले असल्याचे ते म्हणाले.

या वेळी दिल्ली येथील डॉ. उमा माहेश्वर राव, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विभागप्रमुख डॉ. विजया नलावडे, हैदराबाद विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र रेड्डी यांचीही या वेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

इतर बातम्या
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...
राज्यात तरी लोकायुक्तांची नियुक्ती करा...नगर   : ‘लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी...
कांदा पट्टयात अस्वस्थता; चौघांनी संपवले...नाशिक   ः गंभीर दुष्काळ स्थिती, कर्ज,...
`कृषिक`मध्ये शेवंतीच्या जाती,...बारामती, जि. पुणे  ः येथे आयोजित कृषिक...
कांद्याच्या उभ्या पिकात चरण्यासाठी...राहुरी, जि. नगर  : कूपनलिकेचे पाणी अचानक...
‘एमसीडीसी’ शेतकरी कंपन्या स्थापन करणारपुणे : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ नाबार्डच्या...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...