agriculture news in marathi, Van project water must be given to agriculture, farmers demand, akola | Agrowon

‘वान’च्या पाण्यावर पहिला हक्क अामचा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

अकोला : अकोला व बुलडाणा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी अारक्षित न करता शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळावे, अशी मागणी तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ६) पालकमंत्र्यांकडे केली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा जनता दरबार अायोजित करण्यात अाला होता. या वेळी तेल्हारा (जि. अकोला) व संग्रामपूर (जि. बुलडाणा) तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागणीचे निवेदन दिले. 

अकोला : अकोला व बुलडाणा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी अारक्षित न करता शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळावे, अशी मागणी तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ६) पालकमंत्र्यांकडे केली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा जनता दरबार अायोजित करण्यात अाला होता. या वेळी तेल्हारा (जि. अकोला) व संग्रामपूर (जि. बुलडाणा) तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागणीचे निवेदन दिले. 

याबाबत शेतकऱ्यांनी म्हटले, की वान प्रकल्पातील पाणी अमृत योजनेअंतर्गत अकोला शहरासाठी अारक्षित करण्याच्या हालचाली सुरू अाहेत. वास्तविक तेल्हारा व संग्रामपूर हे दोन्ही तालुके अादिवासी भागात असून त्या ठिकाणी कुठलेही कारखाने, उद्योग नाहीत. या प्रकल्पाशिवाय इतर दुसरा कुठलाही प्रकल्प नाही. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या अाहेत. यापूर्वी वान प्रकल्पातील ४७ टक्के पाणी शासनाने शेगाव, जळगाव जामोद, तेल्हारा, अकोट या तालुक्यातील गावांसाठी अारक्षित केले अाहे.

प्रकल्पात गाळ साचलेला असून, बाष्पीभवन व गळतीमुळे पाणी कमी होते. त्यामुळे सिंचनासाठी २५ते ३० टक्केच पाणी उपलब्ध अाहे. सिंचनात अडचणी येतात. त्यामुळे शासनाने अकोलासाठी इतर पर्यायाने पाणी अाणावे. शासनाच्या प्रचलित नियमानुसार फक्त प्रकल्पातील १५ टक्के पाणीच पिण्यासाठी अारक्षित करावे व उर्वरित सिंचनासाठी ठेवणे गरजेचे असते; मात्र या प्रकल्पातील १०० टक्के पाणी अारक्षित केले जात अाहे. त्यामुळे हा अन्याय दूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

शेतकरी नेते ललित बहाळे, शेतकरी संघटनेचे तेल्हारा तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, अकोला जिल्हा युवा अाघाडीप्रमुख अविनाश नाकट, गोपाल भाकरे, सचिन धोटे, दिलीप वानखडे, दादा टोहरे, अंनता तलोकार, दिनेश गिर, गंगोत्री पाणीवाटप संस्थेचे (वाडी) अध्यक्ष तुळशीराम मंत्री, विक्रांत बोंद्रे, राजेश ढोले, मनोहर बाजोड, अरविंद तिवाणे, समाधान साबडे, गौरव डेरे, विठ्ठल बजोट, विठ्ठल तिवाणे, नितीन वाघ, नीलेश वाकोडे, विनोद भोगले, दीपक टोहरे, ओम प्रकाश राठी, प्रल्हाद वाघ, विलास ताथोड, श्याम मूर्तीजापूरकर, मनोहर बाजोडकर, सतीश ऊंबरकर अादींनी पालकमंत्र्यांना निवेदन देत मुद्यांवर चर्चा केली. 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प...पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (...
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट... मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...
कर्जमाफीच्या यादीची दुरुस्ती सुरूचजळगाव : कर्जमाफीच्या कार्यवाहीबाबत रोजच नवीन...
एकात्मिक पीक पद्धतीत रेशीमचे स्थान अढळजालना : रेशीम उद्योगातील देशांतर्गत संधी पाहता...
शेळीपालनात शास्त्रोक्‍त पद्धतीकडे वळाजालना : शेळीपालनाला आता गोट फार्म असे आधुनिक नाव...
मक्यावरील करपा रोगाच्या जनुकांचा घेतला...मक्यावरील करपा रोगाला प्रतिकार करणाऱ्या जनुकांचा...
वृद्धापकाळातील नाजूकपणा कमी करण्यात...मध्य पूर्वेतील देशांप्रमाणे फळे, भाज्या,...
बुलडाणा जिल्ह्यात जमिनीचे आरोग्य बिघडलेबुलडाणा : विदर्भ-मराठवाडा-खानदेशला जोडणाऱ्या...
मोहराने बहरल्या काजूच्या बागासिंधुदुर्ग : डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहातील...
पुणे जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ६६४१ कामे... पुणे ः भूजलपातळी वाढविण्याच्या उद्देशाने राज्य...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १०१ टक्के पेरणी सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची...
डाळिंबाला द्या काटेकोर पाणीडाळिंब या पिकाला पाण्याची गरज ही मुळातच खूप कमी...
सरकारला शेतकऱ्यांची नाही, उद्योगपतींची...सातारा : कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख...
माथाडी मंडळे बंद करणे हा आत्मघाती प्रकार पुणे : असंघटित कामगारांची संख्या दिवसेंदिवस...
नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पावरुन...मुंबई : नाणार (ता. राजापूर) येथील प्रस्तावित हरित...
थकीत ‘एफआरपी’ची रक्कम तत्काळ द्या :...पुणे : थकीत एफआरपीची रक्कम तत्काळ देणे, को २६५...
‘महाबीज’च्या निवडणुकीत खासदार संजय...अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या...
अधिक पाण्यामुळे द्राक्ष घडनिर्मितीवर...द्राक्ष वेलीपासून चांगल्या प्रतीच्या...
अतिरिक्त पाण्यामुळे उसाची प्रतिकारशक्ती... अधिक पाण्यामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण...