agriculture news in Marathi, In Varhad, the existing MPs have the opportunity again | Agrowon

वऱ्हाडात विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

अकोला ः लोकसभा निवडणुकीच्या निकालात गुरुवारी (ता.२३) वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात भाजप-शिवसेना युतीचे विद्यमान खासदार विजयी झाले. अकोल्यात संजय धोत्रे(भाजप), बुलडाण्यामध्ये प्रतापराव जाधव (शिवसेना) आणि वाशीम-यवतमाळ मतदार संघात भावना गवळी (शिवसेना)विजयी झाल्या. विशेष म्हणजे तिनही खासदारांनी लाखावर मताधिक्य मिळवीत हे विजय साकारले. 

अकोला ः लोकसभा निवडणुकीच्या निकालात गुरुवारी (ता.२३) वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात भाजप-शिवसेना युतीचे विद्यमान खासदार विजयी झाले. अकोल्यात संजय धोत्रे(भाजप), बुलडाण्यामध्ये प्रतापराव जाधव (शिवसेना) आणि वाशीम-यवतमाळ मतदार संघात भावना गवळी (शिवसेना)विजयी झाल्या. विशेष म्हणजे तिनही खासदारांनी लाखावर मताधिक्य मिळवीत हे विजय साकारले. 

भावना गवळी पाचव्यांदा लोकसभेत  
वाशीम  :  वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी यांनी सलग पाचवा विजय मिळवला. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना त्यांनी धोबीपछाड दिली. ही लोकसभा निवडणूक या मतदारसंघात शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. सुरवातीपासून मतदारांच्या मनात नेमके काय दडले आहे याचा अंदाज घेताना राजकीय विश्‍लेषकांची दमछाक झाली. विजयाचा गुलाल कोण उधळणार याची मतदानापासून उत्सुकता लागलेली होती. गुरुवारी मतमोजणीला सुरवात झाल्यापासून शिवसेना उमेदवार सातत्याने आघाडीवर राहिल्या. रात्री उशिरा ही मतमोजणी संपली. मोजणी अखेर भावना गवळी यांना पाच लाख ४२ हजार ९८ मते मिळाल्याचे जाहीर करीत विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले. तर माणिकराव ठाकरे यांना चार लाख २४ हजार १५९ मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये तब्बल एक लाख १७ हजार ९३९ मतांचा फरक होता. गवळी यांना हे मताधिक्य पाचव्यांदा लोकसभेत घेऊन गेले.

संजय धोत्रे यांचा चौकार
अकोला ः या लोकसभा मतदारसंघात अपेक्षित असलेला निकाल गुरुवारी आला. सुरवातीपासून येथे धोत्रे यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली जात होती. जातीय समिकरणे, त्यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार यामुळे विजय निश्चित मानला जात होता. उत्सुकता होती ती केवळ किती मताधिक्य संजय धोत्रे मिळवतात याची. गुरुवारी झालेल्या मतमोजणीत अखेर धोत्रे यांना पाच लाख ५४ हजार ४४४ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे हिदायत पटेल यांना दोन लाख ५४ हजार ३७०, बहुजन वंचित आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख ७८ हजार ८४८ मते मिळाली. धोत्रे यांनी सुमारे पावणे तीन लाख मतांनी विजय मिळवला. 

प्रतापराव जाधवांची बुलडाण्यात हॅटट्रिक
बुलडाणा : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी ५,२१,९७७ मते मिळवून एकहाती विजय संपादन केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ३,८८,६९० मते प्राप्त झाली. प्रतापराव जाधव यांना त्यांच्यापेक्षा १ लाख ३३ हजार २८७ अधिक मते मिळाल्याने विजयी घोषित करण्यात आले. 

 ही निवडणूक १८ एप्रिलला पार पडली. त्यात जिल्ह्यातील  १७ लाख ५८ हजार ९४३ मतदारांपैकी ११ लाख १७  हजार ४८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदारसंघात सुरवातीपासून विविध तर्कवितर्क लावले जात होते. विजयाबाबत दावे-प्रतिदावे करण्यात आल्याने निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेरीस प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा विजयावर शिक्कामोर्तब केले. सलग तिसऱ्यांदा ते लोकसभेत पोचले आहेत.

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...