agriculture news in marathi, Vari, Mauli_Sopandev meet at bhandi SHegaon | Agrowon

माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने वारकरी झाले भावुक...
विलास काटे
शनिवार, 21 जुलै 2018

भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा धावा केला, की पंढरपूर समीप आल्याची वारकऱ्यांची भावना होते. सावळ्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पावलांना बळ मिळते. सकाळी वारकरी गोल रिंगणात उडीचा खेळ खेळले. तोंडले- बोंडल्यातील ओढ्यावर एकमेकांवर पाणी शिंपडत आनंद लुटला. आनंदाने बहरलेल्या वातावरणात सोहळाटप्पा जवळ आला आणि माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने वारकरी भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांचा कडा पाणावल्या.

भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा धावा केला, की पंढरपूर समीप आल्याची वारकऱ्यांची भावना होते. सावळ्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पावलांना बळ मिळते. सकाळी वारकरी गोल रिंगणात उडीचा खेळ खेळले. तोंडले- बोंडल्यातील ओढ्यावर एकमेकांवर पाणी शिंपडत आनंद लुटला. आनंदाने बहरलेल्या वातावरणात सोहळाटप्पा जवळ आला आणि माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने वारकरी भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांचा कडा पाणावल्या.

वेळापूरजवळ धावा झाला की पंढरपूर जवळ आल्याची चाहूल लागते. गुरुवारी रात्री लाखो भाविकांनी वेळापुरात मुक्काम केला व भल्या पहाटे सोहळ्याबरोबर भंडीशेगावकडे मार्गस्थ झाले. सकाळी ठाकूरबुवाच्या समाधीजवळ सोहळ्यातील तिसरा गोल रिंगणाचा सोहळा अश्वाने दोन फेऱ्या मारून पूर्ण केला. रिंगणानंतर सकाळच्या कोवळ्या उन्हात रंगलेल्या उडीच्या खेळात अवघे वारकरी रंगून गेले. ज्ञानोबा- माउलीच्या जयघोषात परिसर दणाणून गेला. त्यानंतर सोहळा चालू लागला तोंडले बोंडलेच्या दिशेने. दुपारी नंदाच्या ओढ्यातून पालखी सोहळा जात असताना वय विसरून वारकरी एकमेकांवर पाणी उडवत आनंद घेत होते. ग्रामस्थांच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी झाली. त्यानंतर पालखी सोहळ्याने टप्प्याजवळ पंढरपूर तालुक्‍यात प्रवेश केला. तेथे पालखी सोहळा थांबला. त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपानदेवांचा सोहळा तेथे आला. दोन्ही भावांच्या पालख्यांचे रथ एकमेकांशेजारी चिकटून लावण्यात आले. दोन्ही संस्थान मानकऱ्यांनी एकमेकांना नारळ प्रसाद दिला. बंधूभेटीचा सोहळा लाखो भाविकांची डोळ्यात साठविला. सव्वासातशे वर्षांपूर्वी भावंडाची ताटातूट झालेला प्रसंग आठवून भाविकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. 

तोंडले- बोंडले येथे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव या प्रमुख पालख्यांसह अन्य संतांच्या पालख्यांनी पंढरपूर तालुक्‍यात प्रवेश केला. पंढरपूरचा रस्ता वारकऱ्यांच्या गर्दीने भरून गेला.

वारीत आज
    पालखीचा वाखरीला मुक्काम
    गोल आणि उभे रिंगण रंगणार

इतर बातम्या
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळजवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...