agriculture news in marathi, vari, varkari | Agrowon

निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त आरोग्यदायी निर्मळ वारी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जानेवारी 2018

नाशिक  : पंढरपूरला आषाढी वारीमुळे होणारी अस्वच्छता निर्मळ वारी अभियानातून गेल्या तीन वर्षांपासून दूर झाली आहे. याच पद्धतीने यंदा त्र्यंबकेश्‍वर येथे संत निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त येत्या 10 ते 12 जानेवारी या काळात निर्मळ वारी राबविली जाणार आहे. त्यासाठी वारकऱ्यांच्या मुक्कामाची गर्दीची दहा ठिकाणे निश्‍चित करून, तेथे बाराशे फिरती शौचालये, दोन हजार 800 स्वयंसेवक व शेकडो कचराकुंड्यांद्वारे वारकऱ्यांची आध्यात्मिक वारी निर्मळ व आरोग्यदायी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नाशिक  : पंढरपूरला आषाढी वारीमुळे होणारी अस्वच्छता निर्मळ वारी अभियानातून गेल्या तीन वर्षांपासून दूर झाली आहे. याच पद्धतीने यंदा त्र्यंबकेश्‍वर येथे संत निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त येत्या 10 ते 12 जानेवारी या काळात निर्मळ वारी राबविली जाणार आहे. त्यासाठी वारकऱ्यांच्या मुक्कामाची गर्दीची दहा ठिकाणे निश्‍चित करून, तेथे बाराशे फिरती शौचालये, दोन हजार 800 स्वयंसेवक व शेकडो कचराकुंड्यांद्वारे वारकऱ्यांची आध्यात्मिक वारी निर्मळ व आरोग्यदायी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्‍वरला दरवर्षी पौष वद्य एकादशीला संत निवृत्तिनाथ यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्यांद्वारे लाखो वारकरी येतात. ते किमान दोन मुक्काम येथे करतात. या काळात त्यांच्यासाठी होणारे अन्नदान व त्यातून निर्माण होणारा कचरा, उघड्यावर शौचास बसल्यामुळे परिसरात उघड्या मैदानांवर निर्माण झालेली हागणदारी, फेकून दिलेल्या अन्नाचे ढिग व प्लॅस्टिकचे कप, पत्रावळ्यांनी व्यापलेल्या ब्रह्मगिरीच्या दऱ्याखोऱ्या यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी व प्रदूषण होते. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार यात्रेनंतर त्र्यंबकेश्‍वरमध्ये घरटी किमान एकाला विषज्वराची लागण होते.

त्र्यंबकेश्‍वरच्या यात्रेत गेल्या 17 वर्षांपासून वारकऱ्यांना औषधे देण्याचे काम करणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांचे या समस्येवर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांमध्ये राज्य सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या निर्मळ वारी अभियानामुळे दिंडी मुक्कामी थांबणाऱ्या गावांबरोबरच प्रत्यक्ष पंढरपूरमधील रोगराईचे प्रमाण 75 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संत निवृत्तिनाथांच्या यात्रेतही निर्मळ वारी अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला.

शासनाने फिरती शौचालये, कचरापेटी, मैला वाहून नेणारी वाहने, आरोग्य कर्मचारी आदी पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याची तयारी दर्शवल्यामुळे पंढरपूरप्रमाणेच संत निवृत्तिनाथांचीही वारी आता निर्मळ होणार आहे. या निर्मळ वारीसाठी स्वयंसेवक होऊ इच्छिणाऱ्यांनी कृपया वनवासी कल्याण आश्रमाशी संपर्क साधावा.
- डॉ. भरत केळकर, समन्वयक निर्मळ वारी, त्र्यंबकेश्‍वर

इतर अॅग्रो विशेष
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...
मंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...
गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...
उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...
पूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...
कांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...
खानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...
अडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे  : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...
अमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी  : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...
ऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...