agriculture news in Marathi, variation in temperature, Maharashtra | Agrowon

पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

पुणे : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असल्याने तापमानातही चढ-उतार होत आहेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या बागेवाडी येथे गुरुवारी (ता. २५) सायंकाळी वादळीवाऱ्यांमुळे व घाटगेवाडी परिसरात गारपिटीमुळे तीनशे एकरावरील द्राक्ष आणि पपईचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये (ता.२६) मुंबईतील सांताक्रूझ येेथे सर्वाधिक ३६.८ अंश सेल्सिअस, तर परभणी येेथे राज्यातील नीचांकी १३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे.

पुणे : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असल्याने तापमानातही चढ-उतार होत आहेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या बागेवाडी येथे गुरुवारी (ता. २५) सायंकाळी वादळीवाऱ्यांमुळे व घाटगेवाडी परिसरात गारपिटीमुळे तीनशे एकरावरील द्राक्ष आणि पपईचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये (ता.२६) मुंबईतील सांताक्रूझ येेथे सर्वाधिक ३६.८ अंश सेल्सिअस, तर परभणी येेथे राज्यातील नीचांकी १३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे.

शुक्रवारी सकाळपर्यंत ठाणे, रायगड, नगर, पुणे, सांगली, उस्मानाबाद जिल्ह्यांत वादळीवाऱ्यांसह हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. सांगलीतील बागेवाडी (ता. जत) येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळीवाऱ्यांमुळे झाडे उन्मळून, तसेच घरांचेही नुकसान झाले. तर जतपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटगेवाडी येथे वादळी वारा, गारपिटीच्या पावसाने पपई बागेचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने या भागातील नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश कामगार तलाठ्यांना दिले आहेत.

ऑक्टोबर हीटचा प्रभाव असल्याने दिवसाच्या तापमानात वाढ झाली असतानाच, उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचे प्रवाह येण्यास सुरवात झाल्याने राज्यातील किमान तापमानात घट होत आहे. यातच राज्यात वादळीवाऱ्यांसह पाऊस पडत असल्याने तापमानात चढ-उतार होत आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी रात्रीचे तापमान २० अंशांच्या खाली असून, विदर्भ, मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा घट झाली आहे. परभणी येेथे तब्बल ६ अंशांची घट झाल्याचे दिसून आले. तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. आजपासून (ता. २७) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.७ (१९.२), नगर -(१८.२), कोल्हापूर ३१.८ (२२), महाबळेश्‍वर २७.७ (१७.५), मालेगाव ३५.२ (२२), नाशिक ३३.४ (१६.५), सांगली ३१.० (२०.१), सातारा ३१.८ (१८.५), सोलापूर ३० (१८.९), सांताक्रूझ ३६.८ (२३.४), अलिबाग ३४.४ (२३.८), रत्नागिरी ३५ (२३.९), डहाणू ३४.६ (२३.९), आैरंगाबाद ३३ (१७.६), परभणी ३४.९ (१३.८), नांदेड ३६ (१८), उस्मानाबाद २५.२ (१७.७), अकोला ३६ (१८.५), अमरावती ३४.६ (१८.२), बुलडाणा ३५.२ (२०.२), चंद्रपूर -(१९.५), गोंदिया ३३.४ (१८), नागपूर ३४.९ (१६.१), वर्धा ३४.५ (१६.५), यवतमाळ ३६ (१७).

शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - कृषी विभाग):
ठाणे : मुरबाड २५, धसई १५, देहारी १७, न्याहडी १०, सरळगाव २०, कुंभार्ली २४.
रागयड : कासू १२, कामर्ली १८,
नगर : पळशी २९, बोधेगाव १२, शिबलापूर २५, साकूर २६.
पुणे : मुळशी २१, वेल्हा १०,
शिरूर २०
सांगली : कुंभारी ३०.
उस्मानाबाद : उस्मानाबाद
ग्रामीण १३, बेंबळी ११.

इतर अॅग्रो विशेष
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...