agriculture news in Marathi, Variation in temperature in state, Maharashtra | Agrowon

तापमानातील तफावत वाढली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

पुणे : किमान तापमानात घट होऊ लागल्याने राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. यातच उन्हाच्या झळाही अधिक असल्याने कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढली आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानात तब्बल १० ते २३ अंशांची तफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सकाळी अल्हाददायक थंडी तर दुपारी कडाक्याचे ऊन असे हवामान अनुभवायला मिळत आहे.

पुणे : किमान तापमानात घट होऊ लागल्याने राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. यातच उन्हाच्या झळाही अधिक असल्याने कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढली आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानात तब्बल १० ते २३ अंशांची तफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सकाळी अल्हाददायक थंडी तर दुपारी कडाक्याचे ऊन असे हवामान अनुभवायला मिळत आहे.

महिनाभरपेक्षा अधिक काळपासून राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील सर्वाधिक ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या तापमानात घट होत असून, परभणी येथे नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस, तर नाशिक येथे १३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

दिवसाचे तापमान ३५ अंशांच्या वर असताना रात्रीच्या वेळी पारा २० अंशांपेक्षा खाली घसरत आहे. तर कोकणातील कमाल तापमान २० अंशांच्या वर आहे. रविवारी सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रात दिवस रात्रीच्या तापमानात १० ते २३ अंश, कोकणात १२ ते १५, मराठवाड्यात १८ ते २२ अंशांची तर विदर्भात १४ ते १९ अंशांची तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील किमान तापमान घटणार असून, मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

रविवार (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.१ (१६.९), नगर ३८.२, जळगाव ३७.८ (१६.०), कोल्हापूर ३२.६ (१९.३), महाबळेश्‍वर २६.८ (१६.८), मालेगाव ३५.६ (१८.२), नाशिक ३३.१ (१३.५), सांगली ३३.६ (१६.५), सातारा ३२.९ (१६.९), सोलापूर ३४.९ (१७.६), सांताक्रूझ ३६.६ (२१.४), अलिबाग ३४.४ (२२.२), रत्नागिरी ३६.० (२१.०), डहाणू ३७.२ (२३.१), आैरंगाबाद ३३.६ (१५.८), परभणी ३५.० (१३.४), नांदेड ३५.५ (१७.५), उस्मानाबाद ३२.५ (१७.७), अकोला ३६.६ (१७.०), अमरावती ३५.६ (१९.६), बुलडाणा ३४.० (१८.६), चंद्रपूर ३४.६ (२०.४), गोंदिया ३३.१ (१७.५), नागपूर ३४.९ (१७.०), वर्धा ३५.० (१७.६), यवतमाळ ३४.० (१६.४).

इतर अॅग्रो विशेष
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...