agriculture news in Marathi, variations in minimum temperature in state, Maharashtra | Agrowon

राज्यातील किमान तापमानात चढ-उतार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पुणे ः राज्यात काही भागांत आर्द्रता कमी-अधिक होत असल्यामुळे किमान तापमानात चढ-उतार होत आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत थंडी अजूनही कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 
८.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तामपानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे ः राज्यात काही भागांत आर्द्रता कमी-अधिक होत असल्यामुळे किमान तापमानात चढ-उतार होत आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत थंडी अजूनही कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 
८.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तामपानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या रविवार (ता. ४)पर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही आकाश निरभ्र राहील. 

कोकणातील अलिबाग, भिरा, डहाणू येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. भिरा येथे १६.५ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. जळगाव, नाशिक, निफाड येथील किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्या खाली होता. 

औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठाच्या परिसरात ८.३ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील बहुतांशी भागांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. गोंदिया येथे १०.१ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. वाशीम येथील किमान तापमान सरासरीएवढे असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

बुधवारी (ता. ३१) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)  
मुंबई (सांताक्रूझ) १६.४ (-१), अलिबाग १८.४ (१), रत्नागिरी १९.२, भिरा १६.५ (१), डहाणू १७.८ (१), पुणे ९.६ (-२), जळगाव ९.० (-४), कोल्हापूर १५.७, महाबळेश्वर १४.२, मालेगाव १२.० (१), नाशिक ९.४ (-१), निफाड ८.०, सांगली १४.१ (-१), सातारा ११.६ (-२), सोलापूर १२.४ (-५), औरंगाबाद ११.५ (-१), बीड १२.२ (-२), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) ८.३, परभणी शहर १०.० (-६), नांदेड १२.० (-२), उस्मानाबाद ९.४, अकोला १२.५ (-२), अमरावती १४.० (-१), बुलडाणा १५.० (-२), चंद्रपूर १२.४ (-३), गोंदिया १०.१ (-४), नागपूर १०.७ (-३), वाशीम  १४.०, वर्धा १२.४ (-२), यवतमाळ १३.४ (-३)

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...