agriculture news in marathi, Varna water issue, people form Varna Bank agitate | Agrowon

वारणा पाणीप्रश्‍नी रॅली काढून शासनाचा निषेध
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

सांगली : वारणेचे पाणी इचलकरंजी देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत जिल्ह्यातील वारणाकाठच्या गावात रॅली काढून शासनाचा निषेध करण्यात आला. मिरज आणि वाळवा तालुक्‍यांतील गावेच्या गावे बंद करून दानोळी (जि. कोल्हापूर) येथे सुरू असलेल्या आंदोलनास गुरुवारी (ता. १७) गाव बंद ठेवून पाठिंबा दिला. 

सांगली : वारणेचे पाणी इचलकरंजी देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत जिल्ह्यातील वारणाकाठच्या गावात रॅली काढून शासनाचा निषेध करण्यात आला. मिरज आणि वाळवा तालुक्‍यांतील गावेच्या गावे बंद करून दानोळी (जि. कोल्हापूर) येथे सुरू असलेल्या आंदोलनास गुरुवारी (ता. १७) गाव बंद ठेवून पाठिंबा दिला. 

वारणेचे पाणी इचलकरंजीला न देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी येथे आंदोलन सुरू आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा तालुक्‍यांतील सुमारे २० ते २५ गावे गुरुवारी (ता. १७) सकाळपासून बंद करण्यात आली होती. संपूर्ण व्यवहारदेखील बंद होते. मिरज तालुक्‍यातील समडोळी, कवठेपिरान, माळवाडी, दुधगाव या गावांतील कवठेपिरान येथे एकत्र जमले. सकाळी रॅली काढून शासनाचा निषेध केला. प्रत्येक गावात जाऊन लढा उभारू असे आवाहन करत होते. तर वाळवा तालुक्‍यातील कोरेगाव, ढवळी, शिगाव, बागणी, काकाचीवाडी, फार्णेवाडीतील व्यवहार बंद ठेवण्यात आले. या भागातील शेतकरी आक्रमक होण्याची तयारी दाखवू लागले आहे. शासनाने आमचे म्हणणे ऐकले नाही, तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.

पंचगंगा ही इचलकरंजीमधील औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषित झाली आहे. शासनाने पंचगंगेचे प्रदूषण हटवावे आणि ते पाणी द्यावे. आम्ही वारणेचे पाणी कदापिही देणार नाही, असा निर्धार आम्ही केला आहे.
- भीमराव माने, माजी जिल्हा परिषद सदस्य, कवठेपिरान, ता. मिरज.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...