agriculture news in marathi, varvat Bakal APMC, Buldana | Agrowon

व्यापाऱ्यांनी वरवट बकालला उपबाजार ठेवला बंद
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

बुलडाणा : संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने चार व्यापाऱ्यांचे परवाने १५ दिवसांसाठी निलंबित केल्याने अाता उर्वरित व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास नकार दिल्याने पेच तयार झाला अाहे. वरवट बकाल येथील उपबाजारत खरेदी-विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली अाहे. 

बुलडाणा : संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने चार व्यापाऱ्यांचे परवाने १५ दिवसांसाठी निलंबित केल्याने अाता उर्वरित व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास नकार दिल्याने पेच तयार झाला अाहे. वरवट बकाल येथील उपबाजारत खरेदी-विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली अाहे. 

या संदर्भात व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (ता.३) बाजार समितीसह सहकार विभागाला निवेदन देत वरवट बकाल उपबाजार बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. बाजार समितीने काही दिवसांपूर्वीच उमेश अशोक टावरी, अोमप्रकाश पालीवाल, कमलकिशोर गांधी, पीयूष अग्रवाल या चौघांचे व्यापारी परवाने १५ दिवसांसाठी निलंबित केले. या चौघांचा हमीभावाने खरेदी झालेल्या तुरीच्या घोळात सहभाग असल्याचे स्पष्ट होत असल्याचे कारण देत बाजार समितीने ही कारवाई केली होती. ही कारवाई चुकीची असल्याचे उर्वरित व्यापाऱ्यांचे म्हणणे अाहे. राजकीय हेतूने कारवाई केली असून, ती चुकीची अाहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे निलंबित परवाने जोपर्यंत पूर्ववत केले जात नाहीत तोवर कोणतेही खरेदी-विक्रीचे व्यवहार करणार नसल्याचे नीलेश राठी, माया गांधी, प्रियांका इंगळे, प्रेमचंद चांडक, गजानन गोतमारे, ललीत राठी, तुळशीराम गांधी, कृष्णकुमार चांडक, भाईलाल चांडक या व्यापारी, अडत्यांचे निवेदनात म्हणणे अाहे.    

बाजार समिती व व्यापाऱ्यांच्या या खेळामुळे सर्वसामान्य शेतकरी वेठीस धरला गेला अाहे. अाठवड्यात शनिवारी येथे मोठा बाजार भरतो. नेमके याच दिवशी खरेदी विक्री बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...