संभाजी मिसाळ, सुशीला पाटील, विकास साळुंखें ठरले ऊस भुषण

संभाजी मिसाळ, सुशीला पाटील, विकास साळुंखें ठरले ऊस भुषण
संभाजी मिसाळ, सुशीला पाटील, विकास साळुंखें ठरले ऊस भुषण

‘व्हीएसआय’च्या पुरस्कारांची घोषणा; सोनहिरा ‘सर्वोेत्कृष्ट साखर कारखाना’ पुणे : वसंतदादा साखर संस्थेने (व्हीएसआय) २०१६-१७ करिताचे राज्य आणि विभागस्तरावरील पुरस्कार शुक्रवारी (ता. २२) जाहीर केले. यंदाही कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याने विक्रमी ऊस उत्पादनात आघाडी मारली आहे. पूर्वहंगामीसाठी कुंभोज (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील संभाजी आनंदा मिसाळ, सुरू हंगामाकरिता ऐतवडे खु.(ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. सुशीला बाबासाहेब पाटील अाणि खोडव्याकरिता काले (ता. कराड, जि. सातारा) येथील विकास बबन साळुंखे हे ऊस उत्पादक राज्यात प्रथम आले आहेत. तर सर्वोेत्कृष्ट साखर कारखाना म्हणून सोनहिरा साखर कारखान्याची निवड झाली आहे.  साखर संकुल येथे आयोजित पत्रकार परिषद संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, महासंचालक शिवाजीराव देशमुख आणि साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ यांनी ही माहिती दिली. मांजरी येथील संस्थेच्या मुख्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा अाणि पुरस्कार वितरण साेहळा मंगळवारी (ता. २६) होणार आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख असून, या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार अाहेत.

ऊस उत्पादनातील राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचे मानकरी

पुरस्कार हंगाम शेतकरी ऊस उत्पादन  (टन/हेक्टरी)
यशवंतराव चव्हाण पूर्वहंगाम संभाजी मिसाळ २६६.५९*
वसंतराव नाईक सुरू सुशीला पाटील २९५.७६*
आण्णासाहेब शिंदे खोडवा विकास साळुंखे २४६.८५*
*(सर्व विजेत्यांच्या उसाचे वाण हे ८६०३२ आहे.)

ऊस उत्पादनात तीनही हंगामाकरिता प्रथम मानकरी अाणि व्यक्तीगत पुरस्कारांसाठी १० हजार रुपये, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र, तसेच राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या साखर कारखान्यांना १ लाख रुपये, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे स्वरूप असणार आहे. 

साखर कारखाना राज्यस्तरीय इतर पुरस्कार :  १) रावसाहेबदादा पवार ‘सर्वोत्कृष्ट आसवनी’ पुरस्कार : किसनवीर सातारा सहकारी कारखाना, भुईंज, जि. सातारा ४१५ ५३० २) आबासाहेब ऊर्फ किसन महादेव वीर ‘सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन’ पुरस्कार : क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापूलाड सहकारी कारखाना, कुंडल, ता. पळस, जि. सांगली ३) कर्मयोगी शंकररावजी पाटील ‘सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन’ पुरस्कार : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी कारखाना, असलज, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर ४) डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील ‘सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन’ पुरस्कार : श्री छत्रपती शाहू सहकारी कारखाना, कागल, जि. कोल्हापूर ५) विलासरावजी देशमुख ‘सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार’ : श्री दत्त शेतकरी सहकारी कारखाना, शिरोळ, जि. कोल्हापूर

राज्यस्तरीय वैयक्तिक पुरस्कार :  १) उत्कृष्ट ऊस विकास अधिकारी : श्रीशैल एस. हेगण्णा, श्री दत्त कारखाना, शिरोळ, जि. कोल्हापूर २) उत्कृष्ट चीफ इंजिनिअर : आर. बी. पाटील, श्री पांडुरंग कारखाना, श्रीपूर, जि. सोलापूर ३) उत्कृष्ट चीफ केमिस्ट : कृष्णा ए. लोंखडे, ग्रीन पॉवर शुगर्स लि., गोपूज, जि. सातारा ४) उत्कृष्ट चीफ अकाउंटंट : आप्पासाहेब ए. कोरे, क्रांतीअग्रणी, कुंडल, जि. सांगली ५) उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक : सुधीर जी. गेंगे पाटील, नीरा भीमा कारखाना, रेडणी, जि. पुणे ६) उत्कृष्ट कार्यकारी संचालक : एम.डी. मल्लूर, श्री हलसिद्धनाथ कारखाना, निपाणी, कर्नाटक ७) व्हीएसआयमधील उत्कृष्ट कर्मचारी : प्रल्हाद राजाराम सुर्वे, सीनियर बॉयलर असिस्टंट, मायक्रोबायोलॉजी विभाग आणि प्रकाश साहेबराव तरडे, ऑफिस अटेंडन्ट, शुगर इंजि. विभाग ऊस उत्पादक प्रतिक्रिया...  शास्त्रोक्त पद्धतीने शेती केल्याने मला हे यश मिळाले. याचा मला अभिमान आहे. ऊस शेती करताना देशी गायीचे मलमूत्र, शेण, गूळ याची स्लरी वापरली. वेळच्या वेळी खत, व पाण्याच्या मात्रा दिल्या. यामुळे जमीन सुधारणेसाठी मदत झाली. याचेच फळ मला पुरस्काराच्या निमित्ताने मिळाले.  - संभाजी आनंदा मिसाळ,  कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर  शेतीने आम्हाला उभं केले. शेतीमध्ये घरातील प्रत्येक सदस्याने केलेल्या कष्टाला नेहमी चांगले फळ मिळत आले आहे. पुरस्कार मिळाल्याचं दैनिक ‘ॲग्रोवन’कडून समजले. त्यामुळे खूप आनंद झाला. आमच्या शेतीला पुरस्कार मिळाल्याने मान उंचावली आहे. शेतीची अधिक जबाबदारी वाढली आहे.  - श्रीमती. सुशीला बाबासाहेब पाटील, ऐतवडे खुर्द, ता. वाळवा, सांगली  मी गेल्या १५ वर्षांपासून उसाचे पीक करत आहे. तंत्रात बदल करत गेलो तसतसे उत्पादन वाढ होत गेली. यशवंत मोहिते कृष्णा कारखान्यांच्या सहकार्यातून मी प्रस्ताव पाठवला होता. व्हीएसआयचा खोडवा ऊस उत्पादनबद्दल पुरस्कार जाहीर झाल्याने खूप आनंद झाला. या पुरस्कारामुळे उत्साह वाढण्यास मदत झाली आहे.  - विकास बबन साळुंखे,  काले, ता. कऱ्हाड, जि. सातारा.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com