agriculture news in marathi, vasantrao naik agriculture university doing plan for drought situation, parbhani, maharashtra | Agrowon

‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी उपाययोजनांतर्गत कृती आराखडा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

यंदा कमी पावसामुळे मराठवाड्यामध्ये उद्‌भविलेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठाची आहे. त्यामुळे याआधीच्या दुष्काळी वर्षात मराठवाड्यातील फळबागा वाचविण्यासाठी राबविण्यात आलेली तंत्रज्ञान प्रसार मोहीम यंदा नव्या स्वरूपात राबवावी लागणार आहे.
- डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ.

परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे दुष्काळी उपाय योजनांतर्गत कृती आराखडा तयार केला जाणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत कमी खर्चाचे तंत्रज्ञान पोचवले जाणार आहे. फळबागा वाचविण्याच्या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि पशुधन वाचविण्यासाठी चारा उत्पादनावर भर दिला जाणार आहे. विद्यापीठाच्या कृषी विस्तार यंत्रणेतर्फे कृषी विभागाच्या मदतीने कृती आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यादृष्टीने कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सर्व संबंधितांना निर्देश दिले.

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत मराठवाडा विभागात करावयाच्या उपाययोजना अंतर्गत कृती आराखडा तयार करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातील कृषी विस्तार यंत्रणा तसेच अन्य संबंधित विभागांतील शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक बुधवारी (ता. १४) आयोजित करण्यात आली. या वेळी कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी होते. शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, कुलसचिव रणजित पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, नियंत्रक विनोद गायकवाड आदी उपस्थित होते.

डॉ. ढवण म्हणाले, की गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठ तसेच कृषी विभागातर्फे राबविलेल्या तंत्रज्ञान प्रसार तसेच जनजागृती मोहिमेमुळे कापूस उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली. दुष्काळी स्थितीमुळे पशुधन वाचविण्यासाठी चारा उत्पादनावर भर द्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठांतर्गतची सर्व संशोधन केंद्र, महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर मिळून किमान १०० हेक्टर क्षेत्रावर चारा पिकांचे उत्पादन घ्यावे. विविध पिकांच्या अवशेषापासून सकस चारानिर्मितीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे. मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील रब्बी ज्वारीच्या बीजोत्पादन पिकापासून चारा उपलब्ध होईल. त्यासोबतच संकरित गो पैदास केंद्राच्या प्रक्षेत्रावरील विविध चारा पिकांचे बेणे, बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. हायड्रोपोनिक्स तसेच अॅझोला निर्मितीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे.

ओलाव्याअभावी यंदा रब्बी पेरणी क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या रब्बी हंगामासाठी विद्यापीठाकडील हरभरा, करडई आदी पिकांचे शिल्लक बियाणे प्रक्रिया करून जतन करून ठेवावे. लवकरच दुष्काळी उपाययोजनांचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या वेळी डाॅ. पाटील, डॉ. इंगोले यांनी मार्गदर्शन केले.
 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...