परभणी विद्यापीठातर्फे ९०२ हेक्टरवर बीजोत्पादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे ९०२ हेक्टरवर बीजोत्पादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे ९०२ हेक्टरवर बीजोत्पादन

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, भात, कापूस, भुईमूग, सूर्यफूल आदी पिकांसह भेंडी, मिरची, कांदा पिकांचे एकूण ९०२.४० हेक्टरवर बीजोत्पादन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून एकूण ८ हजार ९०३.६० क्विंटल बियाण्यांचे उत्पादन अपेक्षित आहे, अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली.

विद्यापीठाचे परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्र, विविध ठिकाणच्या संशोधन केंद्रांच्या प्रक्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांच्या पैदासकार, पायाभूत, प्रमाणित बियाण्यांचे ९०२.६० हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येईल. सोयाबीनच्या एमएयूएस ६१२, एमएयूएस १६२, एमएयूएस १५८, एमएयूएस ८१, एमएयुएस ७१, जेएस २०-६९, जेएस २०-३४, जेएस २०-३४, जेएस २०-२९, जेएस ९३-०५ या वाणांचे एकूण ६०१.६० हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येईल. त्यापासून ६ हजार १६ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.

तुरीच्या बीडीएन ७१६, बीडीएन ७११, बीएसएमआर ८५३, बीएसएमआर ७३६, बीडीएन ७०८, बीडीएन १३-४१ या वाणांचे १६९.८० हेक्टरवर १ हजार ६९६.४० क्विंटल, मुगाच्या बीएम २००३-२, बीएम २००२-१, बीएम ४, या वाणांचे ५४.१० हेक्टरवर ३२४ क्विंटल, उडदाच्या टीएयू १ या वाणाचे ८ हेक्टरवर, ४० क्विंटल, सूर्यफुलाच्या सीएमएस १७ ए, आरएचए १-१, एलएसएफएच १७१ वाणाचे २ हेक्टरवर, १६ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.

भुईमुगाच्या टीएलजी ४५, एलजीएन १ या वाणाचे २ हेक्टरवर १६ क्विंटल, कपाशीच्या विविध वाणांचे १८.६० हेक्टरवर १११.६० क्विंटल, ज्वारीच्या विविध वाणांचे १६.५० हेक्टरवर १९८ क्विंटल, बाजरीच्या विविध वाणांचे २४ हेक्टरवर २४० क्विंटल, तर भाताच्या टीजेपी ४८ आणि तेरणा या वाणांचे १.८० हेक्टरवर ४५ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.

भाजीपाल्यांत भेंडी, मिरची, कांद्याचा समावेश

भाजीपाल्या पिकांमध्ये भेंडीच्या परभणी क्रांती, मिरचीच्या परभणी तेजस, कांद्याच्या फुले समर्थ वाणांचे एकूण ४ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येईल. २३० क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com