कृषी विद्यापीठाची बोंड अळी नियंत्रणासाठी विशेष मोहीम

कृषी विद्यापीठाची बोंड अळी नियंत्रणासाठी विशेष मोहीम
कृषी विद्यापीठाची बोंड अळी नियंत्रणासाठी विशेष मोहीम

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे विद्यापीठ आपल्या दारी, पीकसंरक्षण तंत्रज्ञान आपल्या दारी ही मोहीम राबविली जात आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पीकसंरक्षण सल्ला देण्यासाठी गुरुवारी (ता. २) या मोहिमेची सुरवात झाली असून शुक्रवारपर्यंत (ता. १०) या तीन जिल्ह्यांतील ३० तालुक्यांतील निवडक गावांतील शेतकऱ्यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने गुलाबी बोंड अळी तसेच अन्य किडींच्या व्यवस्थापनाबाबत सल्ला दिला जाणार आहे.

वनामकृविचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली खासकरून गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी विद्यापीठ आपल्या दारी, पीकसंरक्षण तंत्रज्ञान शेतावरी ही पीक संरक्षक मोहीम राबविण्यात येत आहे. कीटकशास्त्रज्ञ, कृषी विद्यावेत्ता, वनस्पती विकृती शास्त्रज्ञ यांचा समावेश असलेले कृषी शास्त्रज्ञांची पथके तयार करण्यात आली आहेत. कृषी माहिती केंद्राचे प्रमुख तथा कृषी विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे, डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. मिर्झा बेग, डॉ. एस. जी. पुरी हे प्रमुख असलेली पथके.

परभणी जिल्ह्यातील ९ आणि हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यामधील कृषी अधिकाऱ्यांनी निवड केलेल्या गावात जाऊन तसेच अन्य गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत. जिंतूर, सोनपेठ, गंगाखेड (जि. परभणी), वसमत, सेनगांव (जि. हिंगोली) या तालुक्यांचा दौरा या पथकांनी केला. लातूर कृषी विस्तार केंद्रांचे कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी यांच्या नियोजनाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांत हा उपक्रम राबविला जात आहे. डॉ. अरविंद पंडागळे, डॉ. शिवाजी तेलंग, डी. व्ही. पाटील, श्री. डोके, डॉ. अरुण गायकवाड आदी कृषी शास्ज्ञांचा समावेश असलेल्या पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत.

कापूस संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. शिवाजी तेलंग यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी सहायक यांच्या पथकांने शनिवारपर्यंत  (ता. ४) चिखलवाडी, धानोरा, सावरी, कोल्हारी, पिंपरी, सिंगरवाडी (ता. किनवट), पापळवाडी, उमरा, आष्टा, सालांबी, हिवळणी (ता. माहूर) आदी २५ गावांतील १०० हून अधिक शेतकऱ्यांच्या बांधावर बोंड अळी नियंत्रणाबाबत माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com