| Agrowon

कुलगुरू डाॅ. अशोक ढवण यांनी स्वीकारला पदभार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या १८ व्या कुलगुरुपदी बदनापूर (जि. जालना) येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डाॅ. अशोक ढवण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डाॅ. ढवण यांनी शुक्रवारी (ता. एक) कुलगुरुंचा पदभार स्वीकारला.

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या १८ व्या कुलगुरुपदी बदनापूर (जि. जालना) येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डाॅ. अशोक ढवण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डाॅ. ढवण यांनी शुक्रवारी (ता. एक) कुलगुरुंचा पदभार स्वीकारला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांचा कार्यकाळ गुरुवारी (ता.३१) संपला. त्यामुळे राज्यपाल तथा कुलपतीचे विद्यासागर यांनी राव यांनी गुरुवारी (ता.३१) डॉ. अशोक श्रीरंगराव ढवण यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली. डॉ. ढवण हे परभणी येथील कृषी महाविद्यालयाचे पदवीधर आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था येथून एम.एस्सी. (कृषी) आणि मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र या विषयात पीएचडी प्राप्त केली. 

यापूर्वी त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी विस्तार शिक्षण संचालक, शिक्षण संचालक या पदावर कार्य केले आहे, त्यांना अध्यापन, प्रशासन प्रदीर्घ अनुभव आहे. डाॅ. ढवण यांच्या नियुक्तीमुळे मराठवाड्यातील शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्नांची जाण असलेली व्यक्ती कुलगुरुपदी विराजमान झाली आहे. याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

शुक्रवारी (ता. एक) डाॅ. अशोक ढवण यांनी कुलगुरुंचा पदभार स्वीकारला. या वेळी संशोधन संचालक डाॅ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डाॅ. गजेंद्र लोंढे, नियंत्रक विनोद गायकवाड, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

सध्या ५० टक्के मनुष्यबळावर विद्यापीठाचा गाडा सुरू आहे. त्यामुळे सर्वांना दुप्प्ट कार्यक्षमतेने काम करावे लागेल. बीजोत्पादनातून विद्यापीठास मोठा महसूल मिळतो.२५ टक्के महसूल वाढविण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांपर्यंत कोरडवाहू शेतीतील तंत्रज्ञान पोचवण्यासाठी विस्तार यंत्रणा सक्षम करण्यावर भर देणार आहोत. बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. कृषी विद्यापीठासोबत शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यामध्ये अॅग्रोवनची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अॅग्रोवनकडून कृषी विस्ताराचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे.
- डाॅ. अशोक ढवण, 
कुलगुरू, वनामकृवि, परभणी.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...