agriculture news in Marathi, vegetable arrival down due to crop loss in pune, Maharashtra | Agrowon

भाजीपाल्याच्या नुकसानीमुळे पुण्यात आवक मंदावली
गणेश कोरे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २२) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रकची आवक झाली हाेती. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत अत्यंत कमी आवक झाल्याने बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली हाेती. ही झालेली भाववाढ पुढील तीन आठवडे तरी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त हाेत आहे.

राज्याच्या विविध भागांत झालेल्या पावसामुळे शेतीमालाचे माेठे नुकसान झाल्याने आवक मंदावली आहे. तर खरिपाच्या पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, नवीन उत्पादन सुरू हाेण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याने बाजारातील भाजीपाल्याची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. 

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २२) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रकची आवक झाली हाेती. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत अत्यंत कमी आवक झाल्याने बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली हाेती. ही झालेली भाववाढ पुढील तीन आठवडे तरी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त हाेत आहे.

राज्याच्या विविध भागांत झालेल्या पावसामुळे शेतीमालाचे माेठे नुकसान झाल्याने आवक मंदावली आहे. तर खरिपाच्या पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, नवीन उत्पादन सुरू हाेण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याने बाजारातील भाजीपाल्याची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. 

भाजीपाल्यांच्या प्रमुख आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून सुमारे १५ टेंपाे हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ५ ट्रक काेबी, कर्नाटकातून भुईमूग सुमारे २ टेंपाे, सिमला येथून मटार १ ट्रक, तर सिमल्यावरूनच मुंबई बाजार समितीमध्ये आलेला मटार पुण्यात सुमारे २०० गाेणी आवक झाली हाेती. तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसूण सुमारे अडीच हजार गोणी, तर आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.

स्थानिक विभागातील आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गाेणी, टोमॅटो सुमारे ५ हजार क्रेट्स, कोबी २०, तर फ्लाॅवर १४ टेंपाे, सिमला मिरची ८ टेंपाे, पारनेर, पुरंदर, वाई सातारा परिसरातून मटार अवघा ३० गाेणी, तांबडा भाेपळा ८ टेंपाे, भेंडी सुमारे ७, तर गवार सुमारे ५ टेंपाे, गाजर सुमारे ५ टेंपाे, पावटा २ टेंपाे, हिरवी मिरची ५ टेंपाे, तर नवीन कांदा सुमारे ५, तर जुना ६० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : नवीन १८०-२५०, जुना ३२०-३७०, बटाटा : ६०-८०, तळेगाव नवीन १००-१४० लसूण : २५०-४५०, आले सातारी : २८०-३१०, बंगलाेर २६०, भेंडी : २५०-३००, गवार : गावरान व सुरती - ४००-५५०, टोमॅटो : २००-३००, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १५०-२५०, चवळी : २००-३००, काकडी : १४०-१६०, कारली : हिरवी २८०-३००, पांढरी : १८०-२००, पापडी : २५०-३००, पडवळ : २८०-३००, फ्लॉवर : २५०-३२०, कोबी : १६०-२४०, वांगी : ४००-५००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १४०-१८०, ढोबळी मिरची : ५००-६००, तोंडली : कळी ३००-३२०, जाड : १२०-१४०, शेवगा : १०००-११००, गाजर : ३००-३५०, वालवर : ३००-३५०, बीट : ३००-४००, घेवडा : ७००, कोहळा : १४०-१६०, आर्वी : २००-३००, घोसावळे : १८०-२००, ढेमसे : २००-३००, मटार : स्थानिक : ९००-१०००, पावटा : ७००, तांबडा भोपळा : १००-१५०, भुइमूग शेंग - ३५०-४००, सुरण : २८०-३२०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे अवघी ५० हजार, तर मेथीची सुमारे १५ हजार जुड्या आवक झाली हाेती.
कोथिंबीर : १५००-३५००, मेथी : १०००-२०००, शेपू : ८००-१२००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ५००-८००, करडई : ५००-७००, पुदिना : ४००-६००, अंबाडी : ५००-८००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ५००-८००, चुका : ५००-८००, चवळई : ८००-१२००, पालक : ८००-१५००

फळबाजार
फळबाजारात लिंबाची सुमारे ४ हजार गाेणी आवक झाली हाेती. माेसंबी सुमारे ५० टन, संत्रा सुमारे ३० टन, सीताफळ २५ टन, डाळिंब सुमारे १५ टन, कलिंगड सुमारे १० टेंपाे, खरबूज सुमारे १२ टेंपाे, पपई सुमारे ८ टेंपाे, चिकू सुमारे १ हजार बॉक्स, पेरू सुमारे २०० क्रेटची आवक झाली हाेती. तर विविध बाेरांची सुमारे ४०० गाेणी आवक झाली हाेती.

फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २५०-४००, मोसंबी : (३ डझन) : १४०-२५०, (४ डझन ) : ८०-१४०, संत्रा (३ डझन) १३०-३००, (४ डझन) : ८०-१५०, सीताफळ : ५-९०, (प्रति किलोस) डाळिंब : भगवा : २०-१२५, गणेश १०-४०, आरक्ता २०-६०, कलिंगड २-८, खरबूज ५-१५, पपई ५-१२ चिकू : २००-५०० (१० किलाे), पेरू (२० किलो) : ५००-८००, सफरचंद सिमला २०-२५ किलाे १०००- २२००, काश्मीर डेलिशिअस (१५) ६००-१३००, बाेर (१० किलाेचे दर) ः चेकनट ३५०-४५०, चण्यामण्या ४५०-५५०, चमेली १६०-१८०, उमराण १००-१२०.

फूल बाजाराला सुटी असल्याने बंद हाेता.

मटण मासळी : गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.२२) खोल समुद्रातील मासळींची सुमारे १५ टन, खाडीची सुमारे ५०० किलो, आणि नदीतील मासळीची सुमारे ६०० किलाे आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १६ टन आवक झाली हाेती.

भाव (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी ः १५००-१६००, माेठे ः १५००, मध्यम ः ८००, लहान ः ६००, भिला ः ४००, हलवा ः ४८०, सुरमई ः ४००-४४०, रावस लहान ः ४८०, मोठा ः ६५०, घोळ ः ४८०, करली ः २४०-२८०, करंदी ( सोललेली ) ः २४०, भिंग ः ३२०, पाला : ४००-१४००, वाम ः पिवळी ४००, काळी २८०,  ओले बोंबील ः ६०-१४०.

कोळंबी : लहान : २८०, मोठी :४८०, जंबो प्रॉन्स : १४५०, किंग प्रॉन्स ः ७५०, लॉबस्टर ः १५००, मोरी : २८०, मांदेली : १२०, राणीमासा : १६०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४४०.

खाडीची मासळी : सौंदाळे ः २००, खापी ः २००, नगली ः ४००, तांबोशी ः ३६०, पालू ः १८०, लेपा ः १२०-१८०, शेवटे : २००, बांगडा : १२०-१८०, पेडवी ः ६०, बेळुंजी ः १००, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १००.

नदीची मासळी : रहू ः १४०, कतला ः १८०, मरळ ः ४००, शिवडा : १४०, चिलापी : ६०, मांगूर : १४०, खवली : १६०, आम्ळी ः ८०, खेकडे ः १५० वाम ः ४००

मटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०.

चिकन : चिकन ः १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६०.

अंडी : गावरान : शेकडा : ६०६, डझन : ९०, प्रति नग : ७.५०. इंग्लिश शेकडा : ४४०, डझन : ६०, प्रतिनग : ५

इतर ताज्या घडामोडी
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...
बुलडाणा जिल्ह्यातील ७४८ गावे... बुलडाणा : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात...
टीस विद्यापीठ-एसआयआयएलसी शैक्षणिक करारपुणे : शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित टाटा...
मोहरीवर्गीय आच्छादन पिके तण...तणनाशकांना प्रतिकारकता विकसित झालेली असल्याने...
बीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळापुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना...
औरंगाबाद विभागात ७२ लाख ५१ हजार टन ऊस...औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील सहा...
नाशिक जिल्ह्यातील धरणात ४६ टक्केच पाणी...नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील...
मराठवाड्यात शेततळ्यांचे पूर्णत्‍व...औरंगाबाद : मराठवाड्यात उद्दीष्टाच्या तुलनेत...
सेंद्रीय उत्पादने, सेंद्रीय शेतीला...मुंबई : सेंद्रीय अन्नाची उपलब्धता आणि...
सुपीकता टिकवण्यासाठी संवर्धित शेतीपारंपरिक शेतीपासून किमान मशागत ते शून्य मशागत हा...
पुणे जिल्ह्यात टोमॅटो लागवडीस प्रारंभ पुणे : जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांनी...
साताऱ्यात मेथी ५०० ते ७०० रुपये शेकडा सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
पानवेल व्यवस्थापन सल्लासद्यःस्थितीत पानवेलीच्या शेतात आंतरमशागत, वेलीची...