नगरमध्ये भाजीपाल्याची आवक स्थिर; दरात सुधारणा

नगरमध्ये भाजीपाल्याची आवक स्थिर; दरात सुधारणा
नगरमध्ये भाजीपाल्याची आवक स्थिर; दरात सुधारणा

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनसह अन्य भुसार मालाची आवक कमी झाली आहे. बाजार समितीत गेल्या सप्ताहात ७३१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला ३००० ते ३२५० रुपये दर मिळाला. मूग, उडीदाची आवकही कमी झाली आहे. मात्र, मकाची आवक वाढली आहे. भाजीपाल्याची आवक स्थिर असली तरी दरात काही प्रमाणात तेजी आहे.

नगर बाजार समितीत नगरसह औरंगाबाद, बीड, सोलापूर भागातून भुसार मालाची आवक होत असते. मागील पंधरा दिवसांत मूग, उडीद, सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. गेल्या सप्ताहात मात्र आवक कमी झाली आहे. गावरान ज्वारीची १३६ क्विंटलची आवक होऊन २३०० ते ४००० रुपये दर मिळाला. बाजरीची ९५ क्विंटलची आवक होऊन २१०० ते २८०० रुपये दर मिळाला. हरभऱ्याची १५३ क्विंटलची आवक होऊन ३१७५ ते ३८०० रुपये तर मुगाची २३७ क्विंटलची आवक होऊन ४००० ते ५५०० रुपये दर मिळाला. लाल मिरचीचीही नगरला आवक सुरू झाली आहे.

गेल्या आठवड्यात लाल मिरचीची १७२ क्विंटलची आवक होऊन ४८५८ ते १०६७० रुपये दर मिळाला. गूळडागाची २३८५ क्विंटलची आवक झाली. गुळाला २८५० ते ३६५० रुपये दर मिळाला. मकाची ४१० क्विंटलची आवक होऊन १३२५ ते १४०० रुपये दर मिळाला. सूर्यफुलाची ६४ क्‍विंटलची आवक होऊन ३४५० ते ३४७१ रुपये तर तुरीची १९ क्विंटलची आवक होऊन तीन हजार रुपये दर मिळाला.

बाजार समितीत टोमॅटो, वांगी फ्लावर, काकडी, गवार, दोंडका, भेंडी, हिरवी मिरची. बटाटे, ढोबळी मिरची, शेवगा, लिंबू, आले यासह अन्य भाजीपाल्याची आवक स्थिर आहे. मात्र, दरात तेजी आहे, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com