मुंबईत लसूण प्रतिक्विंटल २७०० ते ४४०० रुपये

लसूण
लसूण

मुंबई ः राज्यात परतीच्या पावसाने लावलेली हजेरी आणि वाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनामुळे मुंबई बाजार समितीमधील खराब शेतमालाची आवक कमी झाली असून शेतमालाची मागणी मंदावल्याने शेतमालाचे दर स्थिरावले. सोमवारी (ता.९) बाजार समितीमध्ये लसणाची ३०४० क्विंटल आवक झाली. त्यास २७०० ते ४४०० व सरासरी ३५५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत कांद्याची १८३४० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल २२०० ते २८०० व सरासरी २५०० रुपये दर दर होते. बटाट्याची १०९०० क्विंटल आवक होती त्यास ५५० ते १२०० रुपये  व सरासरी ८७५ रुपये प्रतिक्विंटल दर होते. लिंबूची ७३९ क्विंटल आवक होऊन त्यास ८० ते १२० रुपये प्रतिशेकडा भाव मिळाला. गाजर, टॉमेटोचेही आवकही स्थिर आहे.  वाटाण्याची २८१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल ९००० रुपये दर मिळाला. स्थानिक आवक  घटल्याने वाटाण्याचे दर  वाढले आहेत, त्याचा परिणाम इतर भाजीपाल्यावर झाल्याचे येथील व्यापारी नानासाहेब बोरकर यांनी सांगितले. टोमॅटोला प्रतिक्विंटल ५३७ रुपयांपर्यंत दर होते. मिरचीची २७४२ क्विंटल आवक होऊन सरासरी दर ३००० रुपयांपर्यंत दर होता.  बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये) 

शेतमाल     आवक      किमान      कमाल     सरासरी
भुईमूग शेंगा ६७     ३०००     ४०००     ३५००
आले     ७२०     २४००     २८००    

२६००

भेंडी     २०१०     २०००     २६००     २३००
फ्लॉवर     १४२८     १८००     २२००     २०००
गवार     १११     ३५००     ४०००     ३५००
शेवगा     २८०     २२००     २६००     २४००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com