agriculture news in marathi, Vegetable prices are stable in Pune except onion | Agrowon

पुण्यात कांदा वगळता भाजीपाला दर स्थिर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२६) भाजीपाल्यांची सुमारे १७० ट्रक आवक झाली हाेती. कांद्याच्या दरात थाेडी दरवाढ वगळता इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर हाेते.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये बेंगलोर येथून दोन टेंपो आले, मध्य प्रदेश मधून १३ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून तीन ते चार ट्रक कोबी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १६ टेंपो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ३ टेंपो शेवगा, राजस्थान येथून ७ ट्रक गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची अडीच हजार गोणी इतकी आवक झाली हाेती.

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२६) भाजीपाल्यांची सुमारे १७० ट्रक आवक झाली हाेती. कांद्याच्या दरात थाेडी दरवाढ वगळता इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर हाेते.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये बेंगलोर येथून दोन टेंपो आले, मध्य प्रदेश मधून १३ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून तीन ते चार ट्रक कोबी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १६ टेंपो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ३ टेंपो शेवगा, राजस्थान येथून ७ ट्रक गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची अडीच हजार गोणी इतकी आवक झाली हाेती.

तर स्थानिक आवकेत सातारी आले सुमारे १ हजार ८०० गाेणी, टॉमेटोची पाच ते साडेपाच हजार क्रेट, हिरवी मिरची सुमारे ४ टेंपो, फ्लॉवर आणि काेबी प्रत्येकी सुमारे २० टेंपाे, ढोबळी मिरची सुमारे १२ टेंपो, भुईमूग शेंग २५ पोती, पावटा ८ टेंपो, वांगी १२ टेंपो, तांबडा भोपळा १० टेंपो, गवार ६ टेंपो, भेंडीची १० टेंपो, तर कांद्याची सुमारे १४० ट्रक आणि आग्रा, इंदूर आणि स्थानिक भागातून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : नवा : ३५०-४५०, जुना : ४००-५२०, बटाटा : ५०-११०, लसूण : १५०-४५०, आले : १६०-२४०, भेंडी : १५०-२५०, गवार : गावरान व सुरती ३००-४०० टोमॅटो : २८०-३५०, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : ४०-१००, चवळी : २००-२५०, काकडी : ५०-१००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : १८०-२००, पापडी : ३००-३५०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : ४०-८०, कोबी : १४०-२००, वांगी : ६०-१००, डिंगरी : १८०-२००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २४०-२५०, जाड : १००, शेवगा : ११००, गाजर : २५०-३००, वालवर : २५०-३००, बीट : २५०-३००, घेवडा : ४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : १८०-२००, पावटा : ३००-३५०, भुईमूग शेंग : ३५०, मटार : ४००-४५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २८०-३००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे अडीच लाख, तर मेथीची दीड लाख जुड्या आवक झाली हाेती.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २००-६००, मेथी : २००-४००, शेपू : १०००-१२००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ८००-११००, करडई : ४००-५००, पुदिना : ५००-६००, अंबाडी : ४००-५००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-७००, चवळई : २००-४००, पालक : ५००-७००, हरभरा गड्डी : ६००-१२००.

फळबाजार
रविवारी (ता.२६) फळबाजारात मोसंबी ८० टन, संत्री ३ टन, डाळिंब सुमारे ८० टन, पपई सुमारे २० टेंपोे, लिंबे सुमारे ७ हजार गोणी, चिकू २ हजार बॉक्स, पेरू १ हजार क्रेट्स, कलिंगड २० टेपो, खरबूज १५ टेंपो, विविध जातींची सुमारे साडेतीन हजार गोणी, द्राक्षे २ टन, स्ट्रॉबेरी सुमारे दीड टन, सीताफळ २ टन आवक झाली हाेती.

फळांचे दर ः लिंबे (प्रति गोणी) : ३०-८०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : २००-२८०, (४ डझन) : १३०-२००, संत्रा : (३ डझन) १२०-२५०, (४ डझन) : ८०-१४०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : १५-६०, गणेश ५-२०, आरक्ता १०-३०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२५, पपई : ५-२०, चिकू : १००-५००, पेरू (२० किलो) : ३००-५००, सीताफळ : १५-१००. सफरचंद : सिमला (२० ते २५ किलो) : ११००-१५००, काश्मीर डेलिशियस (१५ किलो) ७००-१३००, किन्नोर : (२५ किलो) १५००-२३००, अमेरिकन डेलिशियस : (१५ किलो) १०००-१२००, महाराजा ( १५ किलो) : ५००-७००. बोरे : चेकनट (१० किलो) ४५०-५००, चण्यामण्या : २५०-२८०, चमेली : ८०-१००, उमराण : ६०-७०, द्राक्षे : तासगणेश (१५ किलो) ९००-१२००, जम्बो (१० किलो) : ९००-१२५०, स्ट्रॉबेरी (२ किलाे पनेट) १५०-३००.

मासळीबाजार
गणेश पेठेतील घाऊक मासळी बाजारात रविवारी (ता.२६) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ९ टन, खाडीच्या मासळीची सुमारे ४०० किलो आणि नदीतील मासळीची सुमारे ७०० किलो इतकी आवक झाली. तर आंध्र प्रदेशातील रहू, कतला, सिलन या मासळींची सुमारे १२ टन आवक झाली हाेती. अशी माहीती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

मासळीचे दर पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १४००, मोठे : १४००, मध्यम : ७५०, लहान : ६००, भिला : ४००, हलवा : ४८०, सुरमई : ४४०, रावस लहान : ४००-६००, मोठा : १०००, घोळ : ४८०, करली : २४०, करंदी ( सोललेली ) : २००, भिंग : २००, पाला : ७००-१४००, वाम : २४०-४८०, ओले बोंबील : १००, कोळंबी : लहान : २००, मोठी : ४८०, जंबो प्रॉन्स : १४५०, किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १५००, मोरी : २४०, मांदेली : १००, राणीमासा : १६०, खेकडे : २००, चिंबोऱ्या ४००

खाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : ४००, तांबोशी : २८०, पालू : २४०, लेपा : १८० शेवटे : २४०, बांगडा : १६०, पेडवी : ६०, बेळुंजी : १००, तिसऱ्या : १६०, खुबे : १४०, तारली : १००.

नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १८०, मरळ : ४००, शिवडा : १६०, चिलापी : ६०, मांगूर : १४०, खवली : १६०, आम्ळी : ६०, खेकडे : १६०, वाम : ४४०

मटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे : ४४०, खिमा : ४४०, कलेजी : ४८०.

चिकन : चिकन : १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०.

अंडी : गावरान : शेकडा : ८२०, डझन : १२० प्रति नग : १०. इंग्लिश : शेकडा : ४७५ डझन : ६६ प्रतिनग : ५.५०

फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे :
झेंडू : १०-३०, गुलछडी : २०-५०, बिजली : २०-४०, कापरी : १०-४०, सुटा कागडा : १५०-२५०, शेवंती : ३०-६०, ॲस्टर : ३-८, गुलाब (गड्डीचे भाव) : २०-४०, ग्लॅडिएटर : २०-३० गुलछडी काडी : १०-६०, डच गुलाब (२० नग) : ८०-१५०, लिली बंडल : ३-६ जरबेरा : ५०-१००, कार्नेशियन : १५०-२५० अबोली लड : २००-३००.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...