agriculture news in Marathi, vegetable prices up in Kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारले
राजकुमार चौगुले
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सप्ताहात टोमॅटो, ढोबळी मिरची, हिरवी मिरची आवक मंदावली. टोमॅटोची सातशे ते आठशे कॅरेट इतकी आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस १०० ते २५० रुपये इतका दर मिळाला. 

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात बहुतांशी भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली. गेले आठवडा भर सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने भाजीपाला उत्पादकांच्या वेळापत्रकात मोठा व्यत्यय आणला आहे. आवक कमी असल्याने काही भाज्यांच्या दरात गेल्या सप्ताहापेक्षा सुधारणा दिसून आली.

सप्ताहात पावसापासून बचाव करून भाजीपाल्याचा दर्जा कायम राखण्यासाठी उत्पादकाला मोठे कष्ट घ्यावे लागले. सप्ताहात टोमॅटो, ढोबळी मिरची, हिरवी मिरची आवक मंदावली. टोमॅटोची सातशे ते आठशे कॅरेट इतकी आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस १०० ते २५० रुपये इतका दर मिळाला. 

वांग्याची दोनशे ते तीनशे करंड्या आवक झाली. वांग्यास दहा किलोस १०० ते ६०० रुपये दर होता. हिरवी मिरचीची दोनशे ते तीनशे पोती आवक होती. २०० ते ३०० रुपये दर मिळाला. गवारीच्या आवकेत घट कायम होती. गवारीची दररोज चाळीस ते पन्नास पाट्या आवक झाली. गवारीस दहा किलोस २०० ते २८० रुपये दर मिळाला. तर भेंडीची दर दहा किलोस १२० ते ३२० रुपये होता. भेंडीची शंभर ते दीडशे पाट्या आवक झाली. वरण्याची चाळीस ते पन्नास पोती आवक झाली. वरण्यास दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या आवकेत काहीशी सुधारणा दिसून आली. कोथिंबीरीची आवक दहा ते बारा हजार पेंढ्या इतकी होती. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत वीस ते पंचवीस टक्क्‍यांनी कोथिंबीरीची आवक वाढल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले. आवक वाढ झाली असली तरी मागणी कायम असल्याने दर वाढलेलेच होते. कोथिंबीरीस शेकडा ५०० ते २५०० रुपये दर होता. मेथीची सहा हजार पेंढ्या आवक झाली. मेथीस शेकडा ६०० ते १३०० रुपये दर मिळाला. पालक, पोकळ्यास शेकडा ७०० ते १५०० रुपये इतका दर होता. 

आवक घटली
या सप्ताहात पावसाने या भाजीपाल्याच्या काढणीत अडथळे आले. बेळगाव भागातही पाऊस सुरू असल्याने एकूणच भाजीपाल्याची आवक सरासरीच्या तुलनेत वीस टक्क्‍यांपर्यंत घटली होती. अजूनही पाऊस सुरू असल्याने पुढील आठ ते दहा दिवसांतही भाजीपाल्याची आवक फारशी वाढण्याची शक्‍यता कमी असल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
बारामतीतील विकासाचे काम देशातील...बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य...
मराठवाड्यात पीककर्ज वितरण कासवगतीनेऔरंगाबाद : आढावा बैठकींचा सपाटा, काही ठिकाणी...
‘बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र...परभणी : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या...
रताळ्याच्या पिठापासून ‘अ’...टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी...
पोकराअंतर्गत ८४ गावांत आंतरपीक...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत...
पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेनाअकोला  : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या...
‘एकात्मिक व्यवस्थापनातून एकरी १०० टन ऊस...आळेफाटा, जि. पुणे : मातीपरीक्षणानुसार खतांचा...
फुलपिके लागवडीसाठी हवी निचऱ्याची जमीनखरीप हंगामात पाऊस भरपूर पडत असल्याने हा हंगाम...
कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर...पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे...नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर...
‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी...मुंबई : मार्च-२०१८ अखेर राज्यात...
पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन...पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या...
ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान...पुणे ः सहकारी साखर कारखाने शक्तिस्थळे असून,...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; चार...सातारा : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने...
शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ...सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक...
नगर जिल्ह्यात बियाण्यांची अवघी दहा...नगर ः खरिपासाठी जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांची...
सांगली जिल्हा बॅंकेकडून २९८ कोटींचे...सांगली : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असताना...
तूर नोंदणीपासून वंचित ठेवल्याचा खुलासा...नगर : शेवगाव बाजार समितीअंतर्गत सुरू...
कोल्हापूर जिल्ह्याचा ३६५ कोटींचा योजना...कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या...
कुपोषण मुक्तीसाठी शेतकऱ्याने शेवगा...नाशिक  : कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास आपलाही...