पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर; बोरांची आवक

पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर असल्याने विविध भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. मात्र गवार, दोडका, हिरवी मिरची, श्रावणी घेवडा यांच्या दरात वाढ झाली होती. तर मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांना मागणी वाढल्याने दर स्थिर होते.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश येथून सुमारे १५ टेंपो हिरवी मिरची, बंगळूर येथून ४ टेंपो आले, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ टेंपो शेवगा, राजस्थान येथून १२ ट्रक गाजर, मध्य प्रदेश आणि पंजाब येथून सुमारे २५ ट्रक मटार, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतील झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० गोणी, टॉमेटोे सुमारे ४ हजार क्रेट, कोबी फ्लॉवर प्रत्येकी सुमारे १२ टेंपो, भेंडी ७ टेंपो, गवार ४ टेंपो, ढोबळी मिरची १० टेंपो, हिरवी मिरची ४ टेंपो, पावटा ८ टेंपो, शेवगा ४ टेंपो, भुईमूग शेंग ४० गोणी तसेच नवीन आणि जुना कांदा प्रत्येकी सुमारे ७५ ट्रक, आग्रा, इंदूर येथून बटाट्याची ५५ ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : जुना ४०-९०, जुना ८०-१२०, बटाटा : आग्रा ६०-१००, इंदूर २००-२२०, लसूण : १५०-२००, आले : सातारी : बंगळूर - ५००-६००, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान, सुरती ४००-५००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२२०, काकडी : १४०-१६०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : २००-२२०, पापडी : २००-२२०, पडवळ : १४०-१६०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : ५०-१००, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२२०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : ९०-१००, शेवगा : ३००-४००, गाजर : १००-१६०, वालवर : २२०-२५०, बीट : ८०-१००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १५०-२००, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १८०-२००, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ५००, पावटा : २००-२५०, मटार : २२०, गोल्डन -२६०-२८०, तांबडा भोपळा : ६०-१२०, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे सव्वा लाख, तर मेथीची सुमारे १ लाख जुड्या आवक झाली होती.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ८००-१३००, मेथी : ५००-८००, शेपू : ६००-८००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ५००-७००, करडई : ५००-८००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-६००, मुळे : १५००-२०००, राजगिरा : ५००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ६००-७००, पालक : ४००-५००, हरभरा गड्डी : ५००-८००.

फळबाजार रविवारी (ता. १६) फळ विभागात मोसंबी सुमारे ६० टन, संत्री ७ टन, डाळिंब २०० टन, पपई २० टेंपोे, लिंबे सुमारे ४ हजार गोणी, चिकू ५०० बॉक्स आणि गोणी, पेरू १ हजार ५०० क्रेटस्, कलिंगड २५ टेंपो, खरबूज १० टेंपो, विविध जातींची बोरे सुमारे अडीच हजार गोणी, सीताफळ सुमारे ३ टन आवक झाली होती.

फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ५०-२५०, मोसंबी : (३ डझन) : १३०-२५०, (४ डझन ) : ५०-१५०, संत्रा : (३ डझन) १३०-२५०, (४ डझन) : ८०-१५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-६०, गणेश ५-२०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिकू : २००-७००, पेरू (२० किलो) : ४००-६००, सीताफळ : २०-१८०, सफरचंद - सिमला (२५ किलो) १२००-१८००, किन्नोर : (२५ ते २८ किलो) २२००-३०००, काश्मीर डेलिशिअस : (१५ किलो) ८००-१३००, बोरे : चेकनट (१० किलो) २२०-२५०, उमराण (१० किलो) ६०-८०, चमेली (१० किलो) १२०-१४०, चण्यामण्या ३२०-३५०. 

फुलबाजार मार्गशीर्ष महिना सुरू झाल्याने फुलांच्या मागणीत वाढ झाल्याने दरातदेखील झालेली वाढ कायम आहे.  फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ४०-७०, गुलछडी : २०-५०, बिजली : ३०-६०, कापरी : ४०-७०, शेवंती ४०-८०, ऑस्टर : १५-२५, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १५-२५, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिली बंडल : ५-८, जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : १००-१५०.

मासळी बाजार मार्गशीर्ष महिना सुरू असल्याने मासळीला मागणी कमी असल्याने व्यापाऱ्यांकडून आवकदेखील कमी होत आहे. परिणामी रविवारी (ता. १६) मासळीचे दर मागच्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे ५ टन, खाडीची सुमारे ५०० किलो, नदीची सुमारे १ टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १२ टन आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.

तर थंडीमुळे अंड्याच्या मागणीत वाढ झाल्याने इंग्लिशसह गावरान अंड्याच्या दरात शेकड्याला ३० ते ३५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर मटण आणि चिकनचे दर मागील आठवड्याच्या तुलनते स्थिर असल्याची माहिती व्यापारी रूपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली. 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :  पापलेट : कापरी : १४००- १५००, मोठे : १४००-१५००, मध्यम : ८००-९००, लहान : ६५०-७००, भिला : ५५०, हलवा : ४४०-४८०, सुरमई : ४४०-४८०, रावस-लहान : ४४०-४८०, मोठे ५५०-६५०, घोळ : ५५०, करली : २४०-२८०, करंदी  (सोललेली) : ३२०,  भिंग : ३२०-३६०, पाला : लहान ५५०-६५०, मोठे : १०००-१२००, वाम : लहान ३२०-३६० पिवळी मोठी ५५०-६००, काळी : २८०, ओले बोंबील : लहान १००, मोठी १६०, 

कोळंबी ः लहान : ३२०, मोठी : ४४०, जंबो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ७५०-८५०, लॉबस्टर : १४००, मोरी : २८०, मांदेली : १२०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : १६०-२४०, चिंबोऱ्या : ४४०-४८०, 

खाडीची मासळी : सौंदाळे : २४०-२८०, खापी १६०-२००, नगली : लहान २८० मोठी ४८०-५५०, तांबोशी ३६०-४००, पालू : २८०,-३२०, लेपा : लहान १००, मोठे २००-२४०, शेवटे : २०० बांगडा : लहान १४० मोठा १८०-२००, पेडवी : ५०, बेळुंजी : १२०-१६०, तिसऱ्या : १६०, तारली : १२०. 

नदीची मासळी : रहू : १५०-१६०, कतला : १८०, मरळ : लहान ३२०, मोठी ४४०, शिवडा : १८० चिलापी : ६०, मागुर : १४०, खवली : १६०, आम्ळी : ८० खेकडे : २००, वाम : ४८०. 

मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.  चिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०.  अंडी : गावरान : शेकडा : ७२०, डझन : ९६ प्रतिनग : ८. इंग्लिश : शेकडा : ४७०  डझन : ६६ प्रतिनग : ५.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com