agriculture news in Marathi, vegetable rate increased in pune, Maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीत पालेभाज्यांच्या दरात तेजी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) भाजीपाल्याच्या सुमारे १७५ ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली हाेती. मात्र वांग्याची आवकेत घट झाल्याने दरात वाढ झाली हाेती, तर काेकणातून आंब्याच्या आवकेत वाढ हाेत असून, हंगाम जाेमात यायला प्रारंभ झाला आहे. रविवारी सुमारे ८ हजार पेट्या आंब्याची आवक झाली हाेती, तर पालेभाज्यांचे दर तेजीत हाेते.

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) भाजीपाल्याच्या सुमारे १७५ ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली हाेती. मात्र वांग्याची आवकेत घट झाल्याने दरात वाढ झाली हाेती, तर काेकणातून आंब्याच्या आवकेत वाढ हाेत असून, हंगाम जाेमात यायला प्रारंभ झाला आहे. रविवारी सुमारे ८ हजार पेट्या आंब्याची आवक झाली हाेती, तर पालेभाज्यांचे दर तेजीत हाेते.

आवकेमध्ये परराज्यांतून- हिमाचल प्रदेशातून सुमारे ३, तर झांशी येथून १ ट्रक मटार, राजस्थान येथून गाजर सुमारे ४ ट्रक, गुजरात आणि कर्नाटकातून काेबी सुमारे ४ ट्रक, गुजरात आणि कर्नाटकातून हिरवी मिरची सुमारे १५ टेंपाे, बंगळूर येथून आले सुमारे १ टेंपाे आणि आंध्र प्रदेश तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ५ टेंपाे आवक झाली हाेती. कर्नाटकातून ताेतापुरी कैरी सुमारे ५ टेम्पाे, तर मध्य प्रदेश, गुजरात येथून लसणाची सुमारे ४ हजार ५०० गाेणी आवक झाली हाेती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गाेणी, टाेमॅटाे सुमारे ५ हजार ५०० हजार क्रेट, हिरवी मिरची ५ टेम्पो, सिमला मिरची १२ टेम्पाे, काेबी १०, तर फ्लॉवर सुमारे १५ टेम्पो, काकडी १० ते १२ टेम्पो, मटार ३०० गाेणी, पावटा ४ टेम्पाे, शेवगा ५ टेम्पाे, तांबडा भाेपळा १२ टेम्पाे, भेंडी ८ तर गवार ३ टेम्पाे, स्थानिक गाजर सुमारे ३०० गाेणी आवक झाली हाेती. कांदा सुमारे १०० ट्रक, आग्रा, इंदौर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : ८०-१००, बटाटा : १२०-१५०, लसूण : १५०-३०० आले : सातारी: २८०-३२०, बेंगलोर : २२०-२४०, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान - सुरती ४००-५००, टोमॅटो : ४०-६०, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ६०-१००, चवळी : १५०-२००, काकडी : ४०-८०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी : १००-१२०, पापडी : १४०-१६०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ५०-७०, कोबी : ३०-५०, वांगी : १००-२००, डिंगरी : १४०-१६०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : २००-२५०, गाजर : स्थानिक ८०-१००, परराज्य. १००-१२०, वालवर : १८०-२००, बीट : ४०-६०, घेवडा : २००-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १४०-१६०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग : ३००-३५०, पावटा : ३००-४००, मटार : स्थानिक ४००-४५०,परराज्य : ४००-४२०, तांबडा भोपळा : ६०-१००, चिंच अखंड ३००-३२०, फाेडलेली ६००-६५०, सुरण : २५०-२५०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे सव्वा लाख, मेथीची सुमारे १५ हजार जुड्या आवक झाली हाेती.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
कोथिंबीर : ३००-१२००, मेथी : १०००-१५००, शेपू : ५००-९००, कांदापात : ५००-७०० चाकवत : ५००-८००, करडई : ५००-६००, पुदिना : १००-१५०, अंबाडी : ५००-८००, मुळे : ८००-१००० राजगिरा : ५००-८००, चुका : ५००-८००, चवळई : ६००-८००, पालक : ५००-८००, हरभरा गड्डी ४००-६००.

फळबाजार
रविवारी (ता. १) फळबाजारात संत्री ८, तर  मोसंबी सुमारे ४५ टन, डाळिंब सुमारे २५ टन, पपई ३ टेम्पोे, लिंबे सुमारे ३ हजार गोणी, चिक्कू दाेन हजार बॉक्स, पेरु सुमारे २५० क्रेट, कलिंगड २५ टेम्पाे, खरबुज १५ टेम्पाे, विविध द्राक्षांची सुमारे १० टन आवक झाली हाेती. तर काेकणातून कच्च्या हापूस आंब्याची सुमारे आठ हजार पेट्यांची आवक झाली हाेती.
फळांचे दर पुढीलप्रमाणे ः लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१२००, मोसंबी : (३ डझन) : १८०-३५०, (४ डझन ) : १००-२२०, संत्रा : (३ डझन) २५०-५००, (४ डझन) : १६०-२५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१५०, गणेश १०-३०, आरक्ता २०-६० कलिंगड : ४-८, खरबूज : १०-१८, पपई : ५-१०, चिक्कू : (प्रति १० किलाे) १००-५००, पेरू (२० किलो) : ५००-६००, द्राक्षे : ताश ए गणेश (१५ किलो) ८००-९००, सुपर सोनाका (१५ किलो) : १०००-१२००,थाॅमसन (१५ किलाे) ५००-६५०, आंबा हापूस ४ ते ८ डझन कच्चा -१ हजार ५०० ते ३  हजार रुपये. तयार २ हजार ते ४ हजार रुपये.

मटण मासळी
गेल्या रविवारी (ता. २५) रामनवमी आणि एकादशीच्या उपवासामुळे मासळीची मागणी घटली हाेती. यामुळे या रविवारी (ता. १) मासळीला मागणी वाढल्याने दरात ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली हाेती. गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील सुमारे १२ टन, खाडीची सुमारे दोनशे ते अडीचशे किलो, नदीची सुमारे दीड टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला सिलनची १२ टन आवक झाली हाेती, अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १५००, मोठे : १४००, मध्यम : ११००, लहान : ८५० भिला : ६५०, हलवा : ६००-६५०, सुरमई : ५५०-६५०, रावस-लहान : ५५०-६५०,  मोठा : ७५०, घोळ : ६००, करली : २८०, करंदी : सोललेली  ३२०.भिंग : ३००, पाला : ५५०-१२००, वाम : पिवळी १८०-२००, मोठी ५५० काळी २००, ओले बोंबील : १६०. 
कोळंबी ः लहान : २८०, मोठी : ४८०, जंबो प्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : २००-२८०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०. 
खाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी : २४०, नगली : ४००, तांबोशी : ४००, पालू : २४०, लेपा : १८०, शेवटे : २००, बांगडा : लहान : १२०, मोठे : १६०-२००, पेडवी : ८०, बेळुंजी : १००-१६०, तिसऱ्या : १६०-१८०, खुबे : १६० तारली : १२०. 
नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ४००, शिवडा : २२०, चिलापी : ६०, मागूर : १५०, खवली : २२०, आम्ळी : १०० खेकडे : २४०, वाम : ५५०. 
मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ४८०. 
चिकन : चिकन : १३०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०. 
अंडी : गावरान : शेकडा : ६००, डझन : ८४ प्रतिनग : ७. इंग्लिश : शेकडा : ३१० डझन : ४८ प्रतिनग : ४.

फूलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर : झेंडू : १०-४०, गुलछडी : ७०-१२०, बिजली : १०-५०, कापरी : २०-४०, माेगरा २००-३५०, ऑस्टर : १०-१५, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ५-१०, गुलछडी काडी : १५-५०, डच गुलाब (२० नग) : २०-५०, लिली बंडल : २-३, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ५०-१००

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
साताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीला मागणी...सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
जळगावात आले ३५०० ते ५८०० रुपये क्विंटलजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता...
परभणी बाजार समितीत कापूस खरेदीस सुरवातपरभणी  ः परभणी बाजार समितीच्या कॅाटन मार्केट...
कोल्हापुरात गूळ प्रतिक्विंटल ३००० ते...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कोल्हापुरात लक्ष्मीपूजनासाठी फळांची आवक...कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात विविध...
औरंगाबादेत सीताफळ १००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात दिवाळीच्या तोंडावर शेतमालाचे दर...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात कांद्याचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकला कांदा, टोमॅटोची आवक वाढलीनाशिक : गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या...
कोल्हापुरात ओला वाटाणा भाज्यांच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरमध्ये भाजीपाल्याची आवक स्थिर; दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनसह...
परभणीत कोबी प्रतिक्विंटल ४०० ते ८००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
खानदेशातील सोयाबीन आवक घटलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २७०० ते ३५८०...सांगली ः येथील बाजार समितीच्या आवारात दिवाळी...
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
बारामतीत ज्वारीचे दरप्रतिक्विंटल चार...पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
खानदेशात ज्वारीची आवक घटली; दर...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...