agriculture news in marathi, vegetable rates in aurangabad market committee | Agrowon

औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १५०० ते १६०० रुपये क्विंटल
संतोष मुंढे
रविवार, 24 सप्टेंबर 2017
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२३) काशीफळाची (लाल भोपळा) २५ क्‍विंटल आवक झाली. यास ८०० ते १००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची ९३ क्‍विंटल आवक झाली. मिरचीला १५०० ते १६०० रुपये क्‍विंटल दर मिळाल्याची माहिती बाजारसमितीच्या सूत्रांनी दिली. 
 
औरंगाबाद बाजारसमितीत कांद्याची ३५३ क्‍विंटल आवक झाली. कांद्याला ३०० ते १५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. टोमॅटोची १७५ क्‍विंटल आवक झाली. 
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२३) काशीफळाची (लाल भोपळा) २५ क्‍विंटल आवक झाली. यास ८०० ते १००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची ९३ क्‍विंटल आवक झाली. मिरचीला १५०० ते १६०० रुपये क्‍विंटल दर मिळाल्याची माहिती बाजारसमितीच्या सूत्रांनी दिली. 
 
औरंगाबाद बाजारसमितीत कांद्याची ३५३ क्‍विंटल आवक झाली. कांद्याला ३०० ते १५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. टोमॅटोची १७५ क्‍विंटल आवक झाली. 
टोमॅटोला २५० ते ५५० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. वांग्याची २५ क्‍विंटल आवक झाली. वांग्याला २००० ते २५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला.५ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ३००० ते ३५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. भेंडीची आवक ३७ क्‍विंटल झाली.
 
भेंडीला १००० ते १८०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. वालशेंगांची आवक ३ क्‍विंटल झाली. यास २५०० ते ३५०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. चवळीची ३ क्‍विंटल आवक झाली. चवळीला २८०० ते ३२०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. मकाची आवक ५३ क्‍विंटल होऊन ६०० ते ९०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. काकडीची ५० क्‍विंटल आवक झाली. काकडीचे दर ४०० ते ७०० रुपये क्‍विंटल होते.
 
लिंबाची १० क्‍विंटल आवक झाली. त्यास २२०० ते ३००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. पत्ताकोबीची ९० क्‍विंटल आवक झाली. त्यास ५०० ते ८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरचे ५४ क्‍विंटल आवक झाली. त्यास १००० ते १६०० रुपये क्‍विंटल दर राहिला. ढोबळ्या मिरचीची आवक ३२ क्‍विंटल होती. या मिरचीला १६०० ते २००० रुपये क्‍विंटल दर मिळाला.
 
पालेभाज्यांमध्ये मेथीची आवक १० हजार जुड्या होती. मेथीला ६०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. पालकाची ९५०० जुड्या आवक झाली. त्यास ५०० ते ७०० रुपये शेकडा असा दर होता. कोथिंबिरीची १३ हजार जुड्या आवक होती. कोथिंबिरीचे दर ६०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा होते. 

इतर ताज्या घडामोडी
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...
पेट्रोलचा सर्वकालीन उच्चांक; सलग...नवी दिल्ली : रुपयाचे अवमूल्यन आणि खनिज तेलाच्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात तेजी कायमपुणे  : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे...
ब्रॉयलर्स बाजार वर्षातील उच्चांकी...गेल्या आठवड्यात ब्रॉयलर्सच्या बाजारभावात जोरदार...
उपवासाने मूलपेशींच्या क्षमतेत होते वाढवाढत्या वयाबरोबरच मूलपेशींच्या कार्यक्षमतेमध्ये...
शाकाहारामध्येही ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा...शाकाहारी आहार अधिक पोषक व संतुलित होण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात कृषी अवजारे बँकेस...सगरोळी, जि. नांदेड : सगरोळी (ता. बिलोली)...
पाणी सर्वेक्षणासाठी पुणे विभागातील ११६...पुणे  ः विहीर, बोअरवेलसाठी आवश्यक भूगर्भातील...
मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत ७.७९...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत...
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने राबविली अर्ज...यवतमाळ : खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानापोटी नगरला...नगर ः कपाशीवर झालेल्या बोंड अळी प्रार्दुभावाच्या...
नगर जिल्ह्यात ४२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर :  जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता...
कृषी राज्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दहा...पुणे : शेतकऱ्यांनो हमीभाव कशाला मागता, मार्केटिंग...
बचत गट आणि महिलांसाठी दुधाळ जनावर वाटप...पुणे : महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन...
अहंकारातूनच माजी खासदाराने जनतेवर...भंडारा : पालघरमध्ये खासदारांचे निधन झाले...
शिवसेना नसली तरी रिपाई भाजपसोबत : रामदस...नागपूर : शिवसेनेने भाजप सोबत युती केली नाही...
शेतीमालाला योग्य भावाची जबाबदारी...इचलकरंजी, जि. कोल्हापूर : ‘‘शेतीमालाला योग्य...
सर्वांच्या प्रयत्नांनीच गोवर्धन उचलला...अतिरिक्त दूध झाल्यास प्रक्रिया वाढविणे, त्यासाठी...
सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट...महाराष्ट्र सध्या दुधाच्या प्रश्नावरून निर्माण...