साताऱ्यात दहा किलो वांगी ४०० ते ४५० रुपये
विकास जाधव
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017
सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४) वांगी, शेवगा, पावटा, वाटाणा, कोबी, दोडका, हिरवी मिरचीचे दर तेजीत होते. वांग्याची तीन क्विंटल आवक झाली. वांग्यास ४०० ते ४५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. गुरुवारच्या (ता.२८) तुलनेत वांग्याच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 
 
सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४) वांगी, शेवगा, पावटा, वाटाणा, कोबी, दोडका, हिरवी मिरचीचे दर तेजीत होते. वांग्याची तीन क्विंटल आवक झाली. वांग्यास ४०० ते ४५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. गुरुवारच्या (ता.२८) तुलनेत वांग्याच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 
 
बाजार समितीत कोबीची १६ क्विंटल आवक झाली. कोबीस १५० ते २०० रुपये प्रति दहाकिलो असा दर मिळाला. शेवग्याची एक क्विंटल आवक झाली. शेवग्यास ५०० ते ६०० रुपये प्रतिदहा किलो दर मिळाला. पावट्याची तीन क्‍विंटल आवक झाली. पावट्यास ४०० ते ५०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. 
 
वाटाण्याची एक क्विंटल आवक झाली. वाटाण्यास ९०० ते १००० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. कोबी, शेवगा, वाटाणा, पावट्याच्या दरात दहा किलो मागे शंभर रुपयांनी वाढ झाली. दोडक्‍याची १२ क्विंटल आवक झाली. दोडक्‍यास ३५० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची १८ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीस २५० ते ३०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. दोडका व हिरवी मिरचीच्या दरात दहा किलो मागे ५० रुपयांनी वाढ झाली. 
 
ओल्या भुईमूग शेंगेची १२ क्विंटल आवक झाली. भुईमूग शेंगेस ३५० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. गवारीची सहा क्विंटल आवक झाली. गवारीस २०० ते २५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. फ्लॉवरची १२ क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला ४०० ते ४५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. 
 
पालेभाज्यांमध्ये मेथी व कोथिंबिरीचे दर तेजीत होते. मेथीची १५०० जुड्या आवक झाली. मेथीला शेकड्यास १४०० ते १६०० रुपये असा दर मिळाला. कोथिंबिरीची १००० जुड्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा १५०० ते २००० रुपये असा दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...