agriculture news in marathi, In the vegetable season, a record 225 truck arrivals | Agrowon

भाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक आवक
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११) साप्ताहिक बंद या दाेन बंदमुळे शेतमालाची ताेडणी कमी झाली हाेती. मात्र, या दाेन दिवसांच्या बंदमुळे रविवारी (ता. १२) बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची हंगामातील विक्रमी सुमारे २२५ ट्रक आवक झाली हाेती.

पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११) साप्ताहिक बंद या दाेन बंदमुळे शेतमालाची ताेडणी कमी झाली हाेती. मात्र, या दाेन दिवसांच्या बंदमुळे रविवारी (ता. १२) बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची हंगामातील विक्रमी सुमारे २२५ ट्रक आवक झाली हाेती.

परराज्यांतून हाेणाऱ्या आवकेमध्ये प्रामुख्याने इंदौरहून सुमारे ८ टेम्पो गाजर, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून ८ टेम्पो शेवगा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून हिरवी मिरची सुमारे २० टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून काेबी सुमारे ५ ट्रक आवक झाली हाेती. तर मध्य प्रदेश गुजरात येथून लसणाची सुमारे ५ हजार गाेणी आवक झाली हाेती.
तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे २ हजार गाेणी, टॉमेटो सुमारे ६ हजार क्रेट, फ्लॅावर २० तर काेबी सुमारे ८ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे १५० पोती, सिमला मिरची १२ टेम्पो, भेंडी १५ टेम्पो, गवार ८ टेम्पाे, हिरवी मिरची ८ टेम्पाे, पावटा १० टेम्पाे, काकडी आणि कारली प्रत्येकी १२ टेम्पाे, तर वाई, सातारा, पारनेर पुरंदर भागातून मटारची सुमारे ५ हजार गाेणी आवक झाली हाेती. तसेच कांद्याची सुमारे ८० ट्रक तर आग्रा, इंदौर, तळेगाव व नाशिक बटाट्याची सुमारे ३० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : १००-१३०, बटाटा : १३०-१८०, लसूण : १५०-३००, आले सातारी : ३५०-४००, भेंडी : १५०-२५०, गवार : गावरान - ३००-४००, सुरती २५०-३५०, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ६०-१२०, कारली : हिरवी १८०-२००, पांढरी : १४०-१५०, पापडी : १८०-२००, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ८०-१२०, वांगी : १००-२००, डिंगरी : १४०-१५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २००-३००, तोंडली : कळी २४०-२६०, जाड : १००-१२०, शेवगा : ३००-३५०, गाजर : १२०-१६०, वालवर : २५०-३००, बीट : १००-१२०, घेवडा : २५०-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १४०-१६०, ढेमसे : २००-२५०, मटार : स्थानिक - २२०-२५०, पावटा : १५०-२००, भुईमूग शेंग - २५०-३५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २४०-२५०, मका कणीस : ६०-१२० (१०किलो) नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर
पालेभाज्यांमध्ये काेथिंबीर सुमारे अडीच लाख तर मेथीची सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली हाेती. कोथिंबीर : २००-४००, मेथी : ८००-११००, शेपू : २००-४००, कांदापात : ५००-७००, चाकवत : ४००- ५००, करडई : ४००-५००, पुदिना : ३००-४००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ५००-६००, चवळई : ५००-७००, पालक : ५००-६००.

फळबाजार
फळ विभागात रविवारी (ता. १२) मोसंबी सुमारे ७० टन, संत्री २ टन, डाळिंब १०० टन, पपई २५ टेम्पोे, लिंबे सुमारे ६ हजार गोणी, चिक्कू ५०० बॉक्स, पेरू ४०० क्रेटस्, कलिंगड २० टेम्पो, खरबुज १० टेम्पो, सीताफळाची १० टन आवक झाली हाेती.
फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ५०-१५०, मोसंबी : (३ डझन) : १००-२००, (४ डझन ) : ४०-८०, संत्रा : ( ३ डझन) १५०-३००, (४ डझन) : ८०-१३०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-७०, गणेश ५-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-२५, पपई : ५-२५, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) : ३००-५००, सीताफळ : २०-१२५.

मटण-मासळी
आजपासून (रविवार) (ता. १२) श्रावण महिन्याला सुरवात झाल्याने मासळीची मागणी माेठ्या प्रमाणावर घटली आहे. परिणामी सर्वच मासळीच्या दरात २० टक्क्यांपर्यंत दर घट झाली असून, ही घट सोमवारपासून ३० टक्क्यांपर्यंत हाेण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त हाेत आहे. दरम्यान, गणेश पेठ येथील मासळीच्या बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे ५ टन, खाडीची सुमारे २०० किलो, नदीची सुमारे ५०० किलो आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ५ टन आवक झाली हाेती, अशी माहिती घाऊक व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १३००, मोठे : १३००, मध्यम : ७००-८०० लहान : ६००, भिला : ४५०, हलवा : ५५०, सुरमई : ६५०, मोठे ८००,  रावस-लहान : ५५०, मोठे  ६५० घोळ : ५५०, करली : ३००, भिंग : २८०, पाला : लहान ६०० मोठा ११००, वाम : पिवळी लहान ३६० मोठे ६००, काळी : २८०, ओले बोंबील : लहान १०० मोठे १४०.
कोळंबी ः लहान १८०, माेठी : ४४० जंबोप्रॉन्स : १३००, किंगप्रॉन्स : ७००, लॉबस्टर : १२००, मोरी : लहान १६०, मोठे २८०, मांदेली : १२० राणीमासा : १८०, खेकडे : १६०-२००, चिंबोऱ्या : ३६०-४४०.
खाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी : २४०, नगली : लहान २८० मोठी ४८० तांबोशी : ४४०, पालू : २४०, लेपा : लहान १४० मोठे २४०, शेवटे : २००  बांगडा : मोठे २००, लहान १२०; पेडवी : ४०, बेळुंजी : १२०, तिसऱ्या : १६० खुबे : १२०. तारली : १००.
नदीची मासळी : रहू : १२०, कतला : १४०, मरळ : लहान २४० मोठी ४००, शिवडा : १६० चिलापी : ४०, मागुर : ९०, खवली :१४०, आम्ळी : ६० खेकडे : १४०, वाम : ४८०.
मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०. चिकन : चिकन : १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : १४०. अंडी : गावरान : शेकडा : ६१०, डझन : ८४ प्रति नग : ७. इंग्लिश : शेकडा : ३५० डझन : ५४ प्रतिनग : ४.५.

फूलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर : झेंडू : ५-२०, गुलछडी : ११०१५०, कापरी : १०-२०, शेवंती ५०-८०, आॅस्टर : १५-२५, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १५-२५, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ५०-७०, लिलिबंडल : १२-१८, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : ५०-१००, जुई २००-३००.

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...