agriculture news in marathi, Vegetables arrival increased in pune but prices are satble, Maharashtra | Agrowon

पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १२) भाजीपाल्याची सुमारे १७० ट्रकची आवक झाली हाेती. रब्बी हंगामातील भाजीपाल्याचे नियमित उत्पादन सुरू हाेत असल्याने आवकेत गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० ट्रकने वाढ झाली हाेती. विविध भाजीपाल्यांच्या आवकेत वाढ हाेऊनदेखील दर स्थिर हाेते. पालेभाज्यांच्या आवकेत काेथिंबिरीची सुमारे अडीच लाख जुड्या आवक झाली हाेती.    
 

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १२) भाजीपाल्याची सुमारे १७० ट्रकची आवक झाली हाेती. रब्बी हंगामातील भाजीपाल्याचे नियमित उत्पादन सुरू हाेत असल्याने आवकेत गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० ट्रकने वाढ झाली हाेती. विविध भाजीपाल्यांच्या आवकेत वाढ हाेऊनदेखील दर स्थिर हाेते. पालेभाज्यांच्या आवकेत काेथिंबिरीची सुमारे अडीच लाख जुड्या आवक झाली हाेती.    
 
भाजीपाल्यांच्या प्रमुख आवकेमध्ये परराज्यांतून मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातून सुमारे ६०० गाेणी मटार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून सुमारे १५ टेंपाे हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ६ ट्रक काेबी, राजस्थानातून गाजर सुमारे ७ टेंपाे, आंध्र प्रदेशातून शेवगा सुमारे ३ टेंपाे, बंगलाेर येथून दाेन टेंपाे आले,  तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसूण सुमारे अडीच हजार गोणी तर आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ७० ट्रक, तर कर्नाटकातून रताळी सुमारे ट्रक आवक झाली हाेती.

स्थानिक विभागातील आवकेमध्ये सातारी आले सुमारे एक हजार ८०० गाेणी, टोमॅटो सुमारे ५ हजार क्रेट्स, कोबी १५, तर फ्लाॅवर २० टेंपाे, सिमला मिरची १० टेंपाे, तांबडा भाेपळा १० टेंपाे, भेंडी १० तर गवार ८ टेंपाे, हिरवी मिरची ६ टेंपाे, भुईमूग शेंगा सुमारे ३० गाेणी, सिमला मिरची १० टेंपाे, तर कराड परिसरातून रताळी २ ट्रक आवक झाली हाेती. तसेच नवीन कांदा सुमारे ४०, तर जुना ६० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : नवीन २००-३००, जुना २५०-३२०, बटाटा : ५०-९०, लसूण : २५०-४५०, आले सातारी : १८०-२४०, बंगलाेर २४०-२५०, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान व सुरती - ३००-५००, टोमॅटो : ३००-३५०, दोडका : ३०० - ३५०, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : २००-२५०, काकडी : १००-१६०, कारली : हिरवी ३००, पांढरी : २००, पापडी : ४००-४५०, पडवळ : २८०-३००, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : २००-२५०, वांगी : ३००-५००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १४०-१५०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी २८०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : १०००, गाजर :२५०-३००, वालवर : ३५०-४५०, बीट : २५०-३५०, घेवडा : ५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : ३५०-४५०, मटार : परराज्य : ७००-७५०, पावटा : ५००, तांबडा भोपळा : ६०-१२०, भुइमूग शेंग ३००-३५०, सुरण : २४०-३००, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००, रताळी १४०-१८०

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे अडीच लाख, तर मेथीची सुमारे ३० हजार जुड्या आवक झाली हाेती. कोथिंबीर : २००-५००, मेथी : १०००-१५००, शेपू : १०००-१५००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ८००-१२००, करडई : ७०० - ८००, पुदिना : ५००-६००, अंबाडी : ६००-७००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ७००-८००, चुका : ५००-६००, चवळई : १०००-१२००, पालक : ७००-८००, हरभरा गड्डी ८००-१०००

फळबाजार
फळ बाजारात लिंबाची सुमारे ६ हजार गाेणी आवक झाली हाेती. माेसंबी सुमारे ६० टन, संत्रा सुमारे १० टन, सीताफळ १० टन, डाळिंब सुमारे ८० टन, कलिंगड सुमारे १५ टेंपाे खरबूज सुमारे २ टेंपाे, पपई सुमारे २० टेंपाे, चिकू सुमारे एक हजार बॉक्स, पेरू सुमारे १५०० क्रेटची आवक झाली हाेती. तर विविध बाेरांची सुमारे दीड हजार गाेणी आवक झाली हाेती.

फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ५०-१७०, मोसंबी : (३ डझन) : १६०-२८०, (४ डझन ) : ८०-१७०, संत्रा (३ डझन) १५०-२२०, (४ डझन) : ६०-१३०, सीताफळ : १०-१००, (प्रति किलोस) डाळिंब : भगवा : २०-८०, गणेश १०-३०, आरक्ता १०-४०, कलिंगड ५-१२, खरबूज २०-४०, पपई ५-२० चिकू : १००-५०० (१० किलाे), पेरू (२० किलो) : ३००-५००, बाेर (१० किलाेचे दर) ः चेकनट ५००-५५०, चण्यामण्या २५०-३००, चमेली १४०-१५०, उमराण १००-१२०, सफरचंद - काश्मीर डेलिशिअस (१५ किलाे) ७००-१३००, महाराजा (१५) ३५०-६००, अमेरिकन (१५) १०००-१२००, सिमला (२५) १२००-१६००, द्राक्षे ः ताश ए गणेश (१०) ६००-९००.

फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : २०-५०, कापरी : १०-२०, शेवंती : २०-४०, ॲस्टर : ८-१२, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : ७-१०, ग्लॅडिएटर : १०- २०, डच गुलाब (२० नग) : ६०-१००, लिली बंडल : ३-६, जरबेरा: २०-४०, कार्नेशियन : १००-१८०, अबोली लड : १५०-२००.

मटण मासळी
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.१२) खोल समुद्रातील मासळींची सुमारे १५ टन, खाडीची सुमारे ५०० किलो, आणि नदीतील मासळीची सुमारे ८०० किलाे आवक झाली हाेती. तर आंध्रप्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १६ टन आवक झाली हाेती. भाव (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी ः १५००, माेठे ः १४००, मध्यम ः ८००, लहान ः ५५०, भिला ः ४००, हलवा ः ४४०, सुरमई ः ४००-४८०, रावस लहान ः ४००-४८०, मोठा ः ६००, घोळ ः ४८०, करली ः २४०, करंदी ( सोललेली ) ः २४०, भिंग ः २००, पाला : ५००-१४००, वाम ः पिवळी २००-३२०, काळी २४०, ओले बोंबील ः ८०-१२०.
कोळंबी : लहान : २४०, मोठी :४४०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स ः ७५०, लॉबस्टर ः १५००, मोरी : २४०, मांदेली : १००, राणीमासा : १४०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४००
खाडीची मासळी : सौंदाळे ः २४०, खापी ः २४०, नगली ः२८०- ४४०, तांबोशी ः ३२०, पालू ः २४०, लेपा ः १००-१८०, शेवटे : २४०, बांगडा : १००-१६०, पेडवी ः ६०, बेळुंजी ः १००, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १००.
नदीची मासळी : रहू ः १४०, कतला ः १८०, मरळ ः ३६०, शिवडा : १६०, चिलापी : ५०, मांगूर : १२०, खवली : १४०, आम्ळी ः ६०, खेकडे ः १६० वाम ः ४००
मटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०.
चिकन : चिकन ः १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०.
अंडी : थंडीमुळे अंड्यांच्या मागणीत वाढ झाली असून, दर देखील वाढले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत  गावरान अंड्यात शेकड्याला २५, तर इंग्लिशमध्ये शेकड्याला २५ रुपयांनी वाढ झाली आहे.
गावरान : शेकडा : ७२०, डझन : ९६, प्रति नग : ८, इंग्लिश शेकडा : ५१८, डझन : ७२, प्रतिनग : ६

इतर ताज्या घडामोडी
नियोजन खरिपाचे : ठिबक, खत व्यवस्थापन...शेतकरी ः विजय इंगळे चित्तलवाडी, ता. तेल्हारा, जि...
नियोजन खरिपाचे : लागवडीसह सिंचन, काढणी...शेतकरी - दीपक माणिक पाटील माचले, ता. चोपडा, जि....
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
परभणीत फ्लॉवर ३५०० ते ५००० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...
पुण्यातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न...पुणे  ः येत्या पाच वर्षांत पुण्याचा...
निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते...सातारा  ः देशात नरेंद्र मोदी यांच्या...
मंत्रिपदाची संधी जळगाव की धुळ्याला?जळगाव ः खानदेशने भाजपला कौल दिला असून, आता...
‘ईव्हीएम’चा विजय असो : छगन भुजबळनाशिक  : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये...
सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसलेंना...सातारा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभा...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...