agriculture news in Marathi, Vegetables rates increased in Jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगावात पालेभाज्यांच्या दरात सुधारणा
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 1 मे 2018

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला व फळे मार्केट यार्डात पालक, पोकळा, कोथिंबीर आदी पालेभाज्यांची आवक गत आठवड्यात काहीशी कमी झाली आहे. दरातही सुधारणा झाली असून, पुढील आठवड्यात दर आणखी बऱ्यापैकी पालेभाज्या उत्पादकांना मिळू शकतील, असे चित्र आहे. 

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला व फळे मार्केट यार्डात पालक, पोकळा, कोथिंबीर आदी पालेभाज्यांची आवक गत आठवड्यात काहीशी कमी झाली आहे. दरातही सुधारणा झाली असून, पुढील आठवड्यात दर आणखी बऱ्यापैकी पालेभाज्या उत्पादकांना मिळू शकतील, असे चित्र आहे. 

पालकची प्रतिदिन तीन क्विंटल आवक राहिली. तिला प्रतिक्विंटल १५०० रुपये दर मिळाला. पोकळ्याची प्रतिदिन दोन क्विंटल आवक होती. आठवड्यातून एक दोन दिवस तर पोकळ्याची आवक अतिशय कमी असते. पोकळ्यालाही प्रतिक्विंटल १४०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची आवक टिकून होती. प्रतिदिन सहा क्विंटल एवढी आवक होती. तिला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. मेथी भाजीची आवकही प्रतिदिन चार क्विंटल एवढी राहिली. तिला प्रतिक्विंटल  १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. मेथी व कोथिंबिरीची आवक स्थानिक क्षेत्रातून होत आहे. परंतु पोकळा, पालकची आवक धुळे, बागलाण भागातून होते, असे सांगण्यात आले. 

टोमॅटोची प्रतिदिन १५ क्विंटल आवक होती. त्याला प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाला. लिंबांची प्रतिदिन सात क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाला. लिंबाच्या दरात काहीशी घसरण झाली. कैरीची आवक प्रतिदिन पाच क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाला. कैरीची आवकही स्थानिक क्षेत्रातून होत नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमधून आवक अधिक असल्याचे सांगण्यात आले. भेंडीची आवक वाढली. प्रतिदिन १८ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १३०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक प्रतिदिन १७ क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाला. अद्रकची प्रतिदिन २० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २४०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर राहिला. 

मक्‍याच्या दरात किरकोळ सुधारणा झाली. त्याची आवक प्रतिक्विंटल २०० क्विंटल होती. दर प्रतिक्विंटल १००० ते १३०० रुपये मिळाला. गव्हाची आवक कमी झाली. ती प्रतिदिन १५० क्विंटलपर्यंत होती. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...