agriculture news in marathi, vel amavasya celebrated in latur, maharashtra | Agrowon

वेळ अमावास्येनिमित्त लातूर जिल्ह्यातील रानं गजबजली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 डिसेंबर 2017
लातूर  ः सतत दोन वर्षे झालेला चांगला पाऊस, काळ्या आईच्या कुशीत उभारी घेत असलेली रब्बीचे पिके, हरिवीगार झालेली रानं, अशा प्रसन्न वातावरणात रविवारी (ता. १७) जिल्ह्यात वेळ अमावास्या उत्साहात साजरी करण्यात आली. या सणाच्या निमित्ताने बळिराजाकडून काळ्या आईचे मनोभावे पूजन करण्यात आले. आप्तेष्टांना, मित्रांना शेतात बोलावून वनभोजनाचा आनंदही सर्वांनी घेतला. या सणाच्या निमित्ताने गावात मात्र शुकशुकाट राहिला; रानं मात्र फुलून गेली होती. 
 
लातूर  ः सतत दोन वर्षे झालेला चांगला पाऊस, काळ्या आईच्या कुशीत उभारी घेत असलेली रब्बीचे पिके, हरिवीगार झालेली रानं, अशा प्रसन्न वातावरणात रविवारी (ता. १७) जिल्ह्यात वेळ अमावास्या उत्साहात साजरी करण्यात आली. या सणाच्या निमित्ताने बळिराजाकडून काळ्या आईचे मनोभावे पूजन करण्यात आले. आप्तेष्टांना, मित्रांना शेतात बोलावून वनभोजनाचा आनंदही सर्वांनी घेतला. या सणाच्या निमित्ताने गावात मात्र शुकशुकाट राहिला; रानं मात्र फुलून गेली होती. 
 
वेळ अमावास्या हा ग्रामीण संस्कृतीचा सण आहे. शेतकरी व शेतीशी निगडित सर्व कुटुंबीय हा सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात. रविवारी वेळ अमावास्या होती. सकाळपासून प्रत्येक घरात शेतात जाण्याची घाईगडबड सुरू राहिली. सकाळी दहा-अकरा वाजता गावात शुकशुकाट; तर शेतं मात्र गजबजली गेली होती. स्वतःची वाहने, तसेच मिळेल त्या वाहनाने नागरिक शेतात जाताना दिसून येत होते. यातूनच एसटी महामंडळाच्या बसला गर्दी होती. खासगी वाहतूक करणारी वाहनेही प्रवाशांनी तुडुंब भरून जाताना दिसत होती.
 
 जिल्ह्यात या वर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी पिके चांगली आहेत. काळ्या आईच्या कुशीत ही पिके उभारी घेत आहेत. पाऊसपाणी चांगले असल्याने शेतकरी समाधानी आहे. त्यामुळे या सणाला सर्वत्र उत्साहाचे वातावरण राहिले. रानारानांत प्रसन्न वातावरणात बळिराजाने काळ्या आईची मनोभावे पूजा केली. प्रत्येक शेतात पाच पांडव तयार करून त्यांचीही पूजा करण्यात आली.
 
वेळ अमावास्या म्हटले की वनभोजनाचा आनंद येतो. वनभोजनासाठी बाजरीच्या भाकरी, सर्व भाज्या एकत्रित करून तयार केलेली भज्जी, वांग्याचे भरीत, ताकापासून तयार केलेले आंबील, बाजरीचे उंडे, तीळ गुळाची पोळी असा मेनू राहिला. आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवाराला बोलावून शेतकऱ्यांनी वनभोजनाचा आनंद दिला. ज्यांना शेती नाही अशांनी शहरातील बागेत जाऊन वनभोजनाचा मनमुराद आनंद घेत हा सण साजरा केला. 
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...