agriculture news in marathi, vel amavasya celebrated in solapur, maharashtra | Agrowon

सोलापुरात वेळ अमावास्येचा उत्साह
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 डिसेंबर 2017
सोलापूर  ः वेळा अमावास्येनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील शेतशिवारात रविवारी (ता. १७) एक वेगळेच चैतन्य भराला आले. पाच पांडवांची प्रतीकात्मक पूजा आणि मित्र आप्तेष्ठांच्या भोजनावळीने शेतशिवारांतील उत्साह अगदीच शिगेला पोचला होता. 
 
सोलापूर  ः वेळा अमावास्येनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील शेतशिवारात रविवारी (ता. १७) एक वेगळेच चैतन्य भराला आले. पाच पांडवांची प्रतीकात्मक पूजा आणि मित्र आप्तेष्ठांच्या भोजनावळीने शेतशिवारांतील उत्साह अगदीच शिगेला पोचला होता. 
 
वेळ अमावास्येला शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक वेगळे महत्त्व असते. मार्गशीर्ष महिन्यातील ही अमावास्या एखाद्या सण, उत्सवाप्रमाणे शेतकरी साजरी करतात. प्रामुख्याने यामध्ये काळ्या आईचे आपण काही देणे लागतो, या समर्पण भावनेने या दिवशी शेतात पाच पांडवांची प्रतीकात्मक पूजा केली जाते. रब्बी हंगामातील पिके या वेळी ऐन भरात आलेली असतात. या पिकांच्या संरक्षणाची जबाबदारी म्हणूनही पांडवांची पूजा केली जाते, अशी अख्यायिका आहे.
 
या दिवशी सर्व प्रकारच्या चुका, पालक, मेथी यांसारख्या भाज्यांचे मिश्रण असलेली भज्जी, पुरणपोळी, बाजरीचे उंडे, ताकाचे अांबील, शेंगापोळी आणि भजीपापडासह गव्हाची खीर असा मेनू नैवैद्यासाठी असतो. या दिवशी खासकरून मित्रमंडळी, पै-पाहुणे, आप्तेष्ट यांना भोजनासाठी आमंत्रण दिलेले असते.
 
आज रविवार आणि त्यातही अमावास्या असा मेळ साधला गेल्याने, जिल्ह्यातील विविध भागांतील शेतशिवारात दुपारी बारानंतर मित्र, आप्तेष्ठांची गर्दी झाली होती. शेतातील मस्त भोजन आणि ऊस, हरभऱ्याच्या रानमेव्याने या उत्साहात आणखीनच भर टाकली.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...