agriculture news in marathi, vel amavasya celebrated in usmanabad, maharashtra | Agrowon

उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ अमावास्या उत्साहात
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 डिसेंबर 2017
उस्मानाबाद : शेतातील उत्पादनात समृद्धी व भरभराट होण्याची मनोकामना व्यक्त करीत काळ्या आईची मनोभावे विधिवत पूजा करून जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी (ता. १७) वेळ अमावास्या शेतकऱ्यांनी उत्साहात साजरी केली.
 
शेतातील पांडवांची, पिकांची पूजा करून शेतकरी कुटुंबीयांनी मित्रपरिवारांसह वनभोजनाचा आनंद घेतला. वेळ अमावास्येमुळे बहुतांश नागरिक शेतात गेल्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये दुपारनंतर अघोषित संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती होती.
 
उस्मानाबाद : शेतातील उत्पादनात समृद्धी व भरभराट होण्याची मनोकामना व्यक्त करीत काळ्या आईची मनोभावे विधिवत पूजा करून जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी (ता. १७) वेळ अमावास्या शेतकऱ्यांनी उत्साहात साजरी केली.
 
शेतातील पांडवांची, पिकांची पूजा करून शेतकरी कुटुंबीयांनी मित्रपरिवारांसह वनभोजनाचा आनंद घेतला. वेळ अमावास्येमुळे बहुतांश नागरिक शेतात गेल्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये दुपारनंतर अघोषित संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती होती.
 
जिल्ह्यात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वेळ अमावास्या शेतकरी कुटुंबीय मोठ्या उत्साहात साजरी करतात. रब्बीच्या पेरणीनंतर येणारी सातवी अमावास्या वेळ अमावास्या म्हणून जिल्ह्यातील शेतकरी साजरी करतात.
 
या सणाची शेतकरी गेल्या तीन-चार दिवसांपासून तयारी करीत होते. शेतात कडब्याच्या पेंढ्यांनी कोप तयार करून त्यात पांडवांची स्थापना केली जाते. पाच दगड एकत्रित करून त्याला गेरू (काव) आणि चुन्यांनी रंगविले जाते. कोपी घालणे, पांडवांना रंगविण्याचे काम गेल्या दोन दिवसांत शेतकऱ्यांनी पूर्ण केले. रविवारी सकाळी कुटुंबातील कर्ता व्यक्ती अांबिलचे माठ घेऊन पायी शेताकडे दाखल झाले. त्यानंतर अनेक कुटुंबांनी पारंपरिक बैलगाडीतून शेत गाठले. त्यानंतर शेतात पांडव, पिके, लक्ष्मीचे पूजन शेतकरी कुटुंबीयांनी केले.
 
पूजनानंतर मित्रपरिवारांसह वनभोजनाचा आनंद घेतला. बाजरी व ज्वारीपासून केलेले उंडे, भात, शेंगाच्या पोळ्या, खीर, विविध पालेभाज्यांपासून तयार केलेली भज्जी, माठातील थंडगार अांबिल असा जेवणाचा बेत होता.
 
वेळ अमावास्येमुळे जिल्ह्याच्या विविध भागांतील शेतशिवारे महिला, पुरुष, मुलां-मुलींनी गजबजून गेले होते. त्यामुळे शहरे मात्र दुपारनंतर ओस पडल्याचे चित्र होते. उस्मानाबादेतील बाजारपेठेही दुपारनंतर बंद होती. 
दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंबीय बैलगाडीने शेताकडे गेले होते. शहरी भागातील कुटुंबीय, मित्रपरिवार मात्र चारचाकी वाहनांतून शेताकडे जात होते. त्यामुळे जीप, सहा आसनी रिक्षा, मालवाहू टेंपोला रविवारी मोठी मागणी होती.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...