agriculture news in marathi, Verification of the seven-year registration for granaries | Agrowon

हरभरा अनुदानासाठी सातबाऱ्यावरील नोंदीची पडताळणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 जुलै 2018

जळगाव : जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्रात हरभरा विक्रीबाबत नोंदणी करूनही विक्रीपासून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवरील हरभरा पिकाच्या नोंदीची पडताळणी केली जात आहे.

जळगाव : जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्रात हरभरा विक्रीबाबत नोंदणी करूनही विक्रीपासून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवरील हरभरा पिकाच्या नोंदीची पडताळणी केली जात आहे.

ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची माहिती मार्केटिंग फेडरेशन मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविली जाणार आहे. जिल्ह्यात सुमारे १७०० शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची विक्री निर्देशीत मुदतीत शासकीय हरभरा खरेदी केंद्रात झाली नव्हती. या शेतकऱ्यांना कमाल दोन हेक्‍टर मर्यादेपर्यंत क्विंटलमागे एक हजार रुपये अनुदान देण्याचे निर्देश शासनाने नुकतेच दिले आहेत.

या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती तहसील कार्यालयांमध्ये पाठविली आहे. या कार्यालयात संबंधित शेतकऱ्यांचे सातबारा उतारे पडताळले जात आहेत. त्यावर हरभरा पिकाची नोंद कुठल्या वर्षी आहे, हे लक्षात घेतले जात आहे. ही माहिती पाठविण्यास आणखी २० दिवस कालावधी लागू शकतो, असे सांगितले जात आहे.

तहसील कार्यालयालयांतील एका कर्मचाऱ्यावर ही माहिती गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर इतर कामांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे माहिती गोळा करून तशा नोंदी, अभिप्राय द्यायला विलंब लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
हरभऱ्याचे चुकारे प्रलंबित
शासकीय केंद्रात हरभरा विक्री केलेल्या अनेक हरभरा उत्पादकांना शेतकी संघांकडून चुकारे मिळालेले नाहीत. तेथील कर्मचाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांची ऑनलाईन माहिती भरताना बॅंक खाते क्रमांक चुकविले आहेत. त्याच्या दुरुस्त्यांना वेळ लागत असून, लवकरच संबंधित शेतकऱ्यांना चुकारे दिले जातील. वरिष्ठ कार्यालयाकडून चुकाऱ्यांबाबत अडचण नसल्याची माहिती संबंधितांकडून मिळाली.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
नाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...